शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

बांधकाम कामगारांना मिळते आर्थिक मदत; पण नोंदणी अत्यावश्यक

By साहेबराव हिवराळे | Published: March 14, 2024 3:12 PM

कामगार उपायुक्त कार्यालयात समक्ष जाऊन किंवा ऑनलाइनही नोंदणी करता येईल.

छत्रपती संभाजीनगर : शहरात जवळपास लाखभर बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यांना आर्थिक तसेच बांधकामासाठी सुरक्षा साहित्य किट, संसारोपयोगी साहित्य किट, आरोग्यसेवा, पाल्यांना शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती सुविधा दिल्या जातात. त्यासाठी नोंदणी करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक व कामगारांची आहे.

कामगार उपायुक्त कार्यालयात समक्ष जाऊन किंवा ऑनलाइनही नोंदणी करता येईल. दरवर्षी कामगारांनी केलेली आपली नोंदणी अद्ययावत (अपडेट) करावी लागते, हेदेखील विसरता कामा नये.

शहरात एक लाख बांधकाम कामगारांची नोंदणीशहर व आसपासच्या परिसरात एक लाखाच्या जवळपास बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. ६० हजार कामगारांना दुपारचे भोजन शासनाकडून मोफत देण्यात येत होते. त्यावर काही अडचणी आल्यामुळे शासनाने ही योजना तात्पुरती बंद केली आहे.

नोंदणी कोणी करायची?नोंदणी करण्याची जबाबदारी कामगार उपायुक्त कार्यालयामधील अधिकारी वर्गाची आहे. बांधकाम कामगारांचा सर्व डेटा कागदपत्रांसह अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. कामगारांनीही जागरूक असावे.

नोंदणी कुठे करायची?कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने ऑनलाइन वेबसाइट देण्यात आलेली आहे. त्यावर कामगार स्वतः अथवा कॅफेवर जाऊन नोंदणी करू शकतात.

नोंदणीचे अनेक लाभआर्थिक मदत : अपघातप्रसंगी कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. जखमी असेल तर उपचारांचा खर्च दिला जातो.

जीवनावश्यक वस्तू : बांधकाम साहित्यासाठी सुरक्षा साहित्याची किट देण्यात येते.

किती कामगारांना वस्तूंचे वाटप?गतवर्षीपर्यंतच्या सर्व कामगारांना सुरक्षा साहित्य किट वाटप करण्यात आलेले आहे. यंदा कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात येत आहे.

अडचणी काय?शासनाची ऑनलाइन वेबसाइट अनेकदा बंद असते. त्यामुळे दूरवरून आलेल्या बांधकाम कामगारांना येण्या-जाण्याचा भुर्दंड पडतो. हजेरी बुडते ती वेगळीच. त्यामुळे वेबसाइट सहजरीत्या उपलब्ध व्हावी; जेणेकरून मजुरांच्या चकरा वाचतील.- गौतम जमधडे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष

स्वत:च नोंदणी करा...कामगारांनी स्वत:ची नोंदणी स्वत: करावी. त्यासाठी ऑनलाइन फॉर्मवर प्रक्रिया करावी.- गोविंद गावंडे, अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLabourकामगार