शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

एमआयएमच्या तीन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:51 AM

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सरकारी कामात अडथळा करून मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयएमच्या सय्यद मतीन बिल्डर, शेख जफर (बिल्डर) आणि अजीम अहमद या तिघांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सरकारी कामात अडथळा करून मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयएमच्या सय्यद मतीन बिल्डर, शेख जफर (बिल्डर) आणि अजीम अहमद या तिघांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आला आहे.महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी त्यांनी महापौरांसमोरील राजदंड हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने अडविल्याने त्याला नगरसेवकांनी मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून महापौर यांच्या दिशेने सभागृहात असणा-या खुर्च्याही भिरकावल्या. या प्रकारामुळे सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनले होते. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा करणे, सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी तीन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे मुख्य सुरक्षारक्षक बाळू सांडू जाधव यांनी सिटी चौक ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही, असे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले. या प्रकरणी महापालिकेने दोन नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन केले आहे.