शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले

By सुमित डोळे | Published: May 04, 2024 12:20 AM

अरुंद रस्ते, वीजपुरवठा खंडित झाल्याने मदतीला उशीर, परिसरात सर्वत्र विजेच्या तारा घरावरच लोंबकळलेल्या

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील रोशन मस्जिदजवळील गल्ली क्र. १५ मध्ये दोन खोल्यांच्या घराने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीचा भडका होऊन घरातील सिलिंडर पेटले व घराला चिकटलेल्या विजेच्या तारांमुळे सलग दोन ते तीन स्फोट झाले. या घटनेत चारवर्षीय चिमुकलीचा भाजल्याने मृत्यू झाला, तर ८ जण गंभीररीत्या भाजले. शुक्रवारी रात्री ८:३० वाजता ही दुर्घटना घडली.

इरफान पठाण हे दोन भावांसह सदर ठिकाणी राहतात. शुक्रवारी रात्री ते नुकतेच कामावरून परतले होते. कुटुंबातील महिला स्वयंपाकाची तयारी करत होत्या. मात्र, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अचानक घरात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण खाेलीला वेढले. कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. ते आतच अडकले; पण आग वाढत असल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, ४ वर्षांची सदफ आतच अडकल्याचे लक्षात आले. तिला वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी पुन्हा आत धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे पत्रे हवेत फेकले गेले. विजेच्या तारा घराच्या वरच लोंबकळत असल्याने ठिणग्या उडून पुन्हा दोन ते तीन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिक तरुणांनी धाव घेत पाणी व वाळू टाकून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती कळताच जिन्सी पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.

सदफचा जागीच मृत्यू, एक गंभीरघाटीतून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेत सदफचा घरातच जळून मृत्यू झाला, तर रिझवान खान सत्तार खान (४०), रिहान चांद शेख (१७), अदिल खान इरफान खान (१०), फैजान रिझवान पठाण (१३), दिशान रिझवान खान (९) यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते.

गल्ली-बोळांमुळे अडचणीकिराडपुऱ्यातील अरुंद रस्त्यांचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. आग लागल्यानंतर अरुंद रस्ते, खंडित झालेला वीजपुरवठा व बघ्यांच्या गर्दीमुळे मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. घराच्या भिंती कमजोर बनल्या. स्थानिकांनी भिंतींना अखेर बांबूचा आधार दिला. रात्री १० वाजेपर्यंत कुटुंबातील एक जण सापडत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन विभागाने मलबा काढला असता कोणीही सापडले नसल्याचे सांगितले. अग्निशमन विभागाचा बंबदेखील बोळीत जाणे अशक्य होते. परिणामी, जवानांनी प्रयत्न करण्यापूर्वीच घर बेचिराख झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक संदीप गुरमे, रामेश्वर गाडे, गौतम पातारे यांच्यासह फॉरेन्सिक विभाग, श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिसDeathमृत्यू