शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणानंतर अग्निशमन केंद्रांना कुलूप; कंत्राटी का होईना जवान भरती करा 

By मुजीब देवणीकर | Published: October 27, 2023 6:54 PM

५० अग्निशमन जवान, २० चालकांची दोन्ही केंद्रांना गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ सप्टेंबर रोजी सिडको एन-९, कांचनवाडी येथील अग्निशमन केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला महिना उलटला तरी अद्याप ही केंद्रे सुरू नाहीत. हे केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे कर्मचारी नाहीत. ५० अग्निशमन जवान, २० चालकांची दोन्ही केंद्रांना गरज आहे. कंत्राटी पद्धतीने का होईना; जवान देण्याची मागणी या विभागाने केली आहे.

शहराचा व्याप झपाट्याने वाढतोय. नगररचना विभागाच्या नवीन बांधकाम नियमावलीनुसार उंच इमारतींना सुद्धा परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन विभागाची जबाबदारी आणखी वाढू लागली. ५० हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या आसपास आहे; पण महापालिकेची फक्त तीन केंद्रे सुरू आहेत. सिडको एन-९, कांचनवाडी येथे दोन नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये इमारती बांधण्यात आल्या. १६ सप्टेंबरचा मुहूर्त शोधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केले; पण महिना उलटल्यानंतरही एकही केंद्र सुरू नाही. यामागे एकमेव मोठे कारण म्हणजे अग्निशमन विभागाकडे कर्मचारीच नाहीत. तीन केंद्रे अगोदरच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू आहेत. नवीन दोन केंद्रे सुरू करायची तर किमान ५० जवान, २० चालक हवे आहेत.

कंत्राटीसाठी दोन मतप्रवाहअग्निशमन विभागाला ७० कंत्राटी कर्मचारी हवेत. माजी सैनिक घ्यावेत, अशी सूचना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी केली. काही अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवले. अग्निशमन विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच घेता येते. यामुळे भरती थांबली आहे.

फक्त दहा वाहनेअग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही नाही. उंच मजल्यावरील आग विझविण्यासाठी मोठे लॅडर नाहीत. सध्या या विभागाकडे रेस्क्यू वाहन, मिनी फायर टेंडरसह दहा वाहने आहेत. व्हीआयपी बंदोबस्त आला तर मोठी पंचाईत होते.

एमआयडीसीची इमारत गळकीचिकलठाणा एमआयडीसी येथे एक अग्निशमन केंद्र आहे. याची इमारत एमआयडीसीची आहे. एमआयडीसी मनपाला वाहने देत नाही. सेवा देण्याचे दायित्व मनपावर आले आहे.

भरतीसाठी प्रयत्न सुरूनवीन दोन अग्निशमन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कर्मचारी उपलब्ध झाल्यावर दोन्ही केंद्रे सुरू होतील.-आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाFire Brigadeअग्निशमन दल