शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कचऱ्यात ‘अग्नि’परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:58 PM

कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिका : पावसाला सुरुवात झाल्याने साथरोग पसरण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. शहरात कचराच दिसू नये म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली होती. मागील एक महिन्यापासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. आता महापालिकेला कचरा प्रश्नात ‘अग्नि’परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.१६ फेबु्रवारी ते आजपर्यंत उन्हाळा होता. महापालिकेने किमान ८० टक्के कचºयाला आग लावण्याचे काम केले. सकाळी आणि रात्री मनपाचे कर्मचारीच कचºयाला आग लावत होते. जुना मोंढा येथे तर कचºयामुळे एक दुकानही जळून खाक झाले होते.सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांवरून मनपाची चोरी चव्हाट्यावर आली. या घटनेतूनही महापालिकेने बोध घेतला नाही. उलट महापालिकेच्या विविध इमारती, चौकाचौकांतील कचºयाच्या ढिगाºयांना आग लावण्याचे काम सुरूच होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. औरंगपुरा, जुनाबाजार, सिटीचौक, मसाप, पैठणगेट, क्रांतीचौक, रोशनगेट आदी अनेक वसाहतींमध्ये कचºयाचे डोंगर साचले आहेत. पावसामुळे कचरा पूर्णपणे ओला झाला आहे. महापालिकेला आता कचºयाला अजिबात आग लावता येणार नाही. आग लावली तरी कचरा अजिबात जळणार नाही, निव्वळ धूर होईल. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळता येत नाही. याच नियमांचे उल्लंघन मागील तीन महिन्यांपासून मनपाकडून करण्यात येत होते.प्रक्रिया करणेही अशक्यप्रायसिडको-हडकोसह शहरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. आता पावसाळ्यात ही प्रक्रिया करणेही अवघड आहे.मनपाने ५ कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणी कंपोस्ट पीट तयार केले आहेत. या पीटचा वापर पावसाळ्यात अजिबात होणार नाही. एका पीटमध्ये २१ दिवस ओला कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करावी लागते.अनेक आजार पसरणारज्याठिकाणी कचरा साचला आहे, तेथे पावसामुळे अनेक जीवजंतू जन्माला येतील. यातून साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. कचºयात मेलेले उंदीर असल्यास त्याच्या पिसवांपासून सुरत शहरात यापूर्वी प्लेग पसरला होता. कचरा साठवून ठेवणे एवढे सोपे नाही, हे मनपाला माहीत असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नRainपाऊस