शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 06, 2023 12:56 PM

बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाबाहेर दीड तासापेक्षा अधिक वेळ उभे राहिलेल्या भाविकांना रात्री ८:४४ वाजता पांढऱ्या कारमध्ये डाव्या बाजूस बसलेले गोरेगोमटे हसतमुख चेहऱ्याचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज दिसले आणि त्यांनी कारमधून बसूनच हात वर करीत सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ‘जय श्रीराम’, बागेश्वर धाम की जय’ असा उत्स्फूर्तपणे जयघोष निनादला.

‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिती रविवारी रात्री बघण्यास मिळाली. बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला. शंखनाद, ढोलताशाचा नाद आणि आतषबाजी सुरू असताना विमानतळाबाहेर कारमधून महाराज बाहेर आले, तेव्हा भाविकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वाहन रॅलीला सुरुवात झाली तेव्हा सारे हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेत होते. कारच्या आजूबाजूला १० पेक्षा अधिक बॉडीगार्ड होते; पण भाविकांनी कारला चोहोबाजूंनी वेढा घातला. लोकांना हटविताना या बॉडीगार्ड्सना घाम फुटला होता. पोलिस बंदोबस्त होता, पण त्यांनाही गर्दी आवरली जात नव्हती. काही भाविक या कारच्या मागे धावत होते. संजयनगरात डीजे लावण्यात आला होता. मुकुंदवाडीत गुलाबांची उधळण करीत भाविकांनी जोरदार स्वागत केले. असेच स्वागत वसंतराव नाईक चौकात झाले. येथे तर जेसीबीवरून पृष्पवृष्टी करण्यात येत होती. यामुळे महाराजांची पांढरी कार गुलाब पाकळ्यांनी भरली होती. गाड्यांचा ताफा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या एन ३ येथील निवासस्थानी पोहोचला. तरीही तासभर हजारो भाविक महाराजांची एक झलक पाहण्यासाठी तिथे थांबून होते.

६ कि.मी.च्या अंतरासाठी लागली ३४ मिनिटेचिकलठाणा विमानतळ ते सिडको एन-३ पर्यंत ६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी पं. धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या ताफ्याला ३४ मिनिटे लागली. एन-३ मध्ये शोभायात्रा पोहोचली तेव्हा वाहन रॅलीतील शेवटचे टोक रामनगर येथे होते.

६ वाजेपासून भाविक विमानतळाबाहेर उभेपं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे सायंकाळी ७ वाजता आगमन होणार होते. यामुळे विमानतळाबाहेर रस्त्यावर शेकडो भाविक ६ वाजल्यापासून उभे होते. महाराजांची कार रात्री ८:४४ वाजता विमानतळाबाहेर आली. तेव्हा महाराजांची झलक पाहून सर्वांना आनंद झाला; पण खूप भाविक असे होते की, त्यांना महाराजांचे दर्शन झालेच नाही.

आज कलशयात्रा आणि हनुमान कथाअयोध्यानगरीत सोमवारपासून पं.धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्रीराम व हनुमान कथेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता क्रांती चौक येथून कलशयात्रा सुरू होणार आहे. पदमपुरा, रेल्वे स्टेशनमार्गे अयोध्यानगरीत कलशयात्रेची सांगता होईल. त्यानंतर, दुपारी ३ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान महाराज हनुमान कथा सांगणार आहेत.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामAurangabadऔरंगाबाद