शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
2
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
3
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
4
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
5
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
6
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
7
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
8
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
9
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
10
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
11
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
12
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
13
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
14
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
15
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
16
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
17
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
18
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
19
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
20
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

परळी शहरामध्ये गोळीबार

By admin | Published: July 16, 2016 12:52 AM

परळी : शहरातील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवकांच्या दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर गोळीबारही झाला. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिली.

परळी : शहरातील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवकांच्या दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर गोळीबारही झाला. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यावरुन ३२ जणांविरुद्ध खुनी हल्ला केल्याचा गुन्हा नोंद झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, बसस्थानकासमोरील एका खासगी दवाखान्याजवळ बाबासाहेब वैजनाथ फड (रा. कन्हेरवाडी ता. परळी) हे उभे होते. यावेळी राजेश बंडू फड (रा. कन्हेरवाडी ता. परळी) याने त्यांच्या दिशेने गोळीबार केला; परंतु त्यांनी गोळी चुकविली. त्याच्यासोबत १५ ते २० सहकारीही तेथे होते. यावेळी त्याने कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे यांच्या घराच्या दिशेनेही एक गोळी झाडली, अशी फिर्याद बाबासाहेब फड यांनी दिली. त्यावरुन शहर ठाण्यात राजेश फडसह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रा. टी.पी. मुंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शहर ठाण्यात पोहोचले. त्यांनी आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ते ठाण्यात बसून होते.विशाल वालचंद उदगीरकर (रा. परळी) यांनी बबलू मुंडे, प्रा. विजय मुंंडे यांच्यासह बारा जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, बसस्थानकासमोर ते उभे होते. यावेळी या सर्वांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. त्यांनी हल्ला चुकविल्याने बोटाला जखम झाली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार नोंदवून घेतली. घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट नाही. शुक्रवारी दिवसभर या घटनेचीच शहर व परिसरात चर्चा होती. (वार्ताहर)