शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:54 AM

मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद शहरात सुरू होत आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब’ असे त्याचे नाव असून, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे यांच्या हस्ते एमजीएम परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद शहरात सुरू होत आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब’ असे त्याचे नाव असून, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे यांच्या हस्ते एमजीएम परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.उद्योग, पर्यटन, कला, संस्कृती आणि आता शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे नाव कमावलेल्या औरंगाबाद शहराच्या वैभवात या केंद्राच्या निमित्ताने आणखी एक भर पडणार आहे. देशाचे राष्ट्रपती राहिलेले ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू होणाºया या विज्ञान केंद्रामध्ये सौर वेधशाळा, सायन्स पार्क, डिजिटल तारांगण, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान दालन, होलोग्राफी थिएटर, ३-डी थिएटर, अंकगणित व भूमिती दालन आणि मूलभूत भौतिकशास्त्र विषयावरची दोन दालने आहेत.औंधकर स्वत: खगोलशास्त्राचे अभ्यासक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे.आदित्य सौर वेधशाळेमध्ये गॅलिलिओने केलेल्या संशोधनापासून ते आजपर्यंतचा इतिहास उलगडून दाखविण्यात येईल. सूर्याचे ‘रिअल टाईम’ अध्ययन व थेट निरीक्षण करण्याची सुविधा आणि दोन अत्याधुनिक टेलिस्कोप येथे आहेत. मराठवाड्यातील पहिले डिजिटल तारांगण केंद्राचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यामध्ये ‘फिश आय फुलडोम’ तंत्रज्ञान वापरून विश्वनिर्मिती ते आधुनिक संशोधनवार आधारित माहितीपट दाखविले जातील. ते पाहून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केंद्रामध्ये इंग्रजी व मराठीतून माहिती सांगणारे प्रशिक्षित विज्ञान संवादक असतील.लेझर होलाग्राफी प्रगत तंत्रज्ञानाद्वारे होलाग्राफीचे प्रत्यक्ष प्रयोग, त्रिमितीय तंत्रज्ञानाचे गुपित उलगडणारे माहितीपट दाखविले जातील. शालेय गणितातील प्रमेय व सिद्धांत समजावून सांगण्यासाठी खास ज्ञानरचनावादावर आधारित प्रयोगशाळा व भौतिकशास्त्रातील संकल्पना व नियम दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट करणारे दालन या केंद्रामध्ये आहे. मुलांना हसतखेळत मनोरंजक पद्धतीने विज्ञानातील नियम समजण्यासाठी विशिष्ट प्रकारची विज्ञान खेळणी ठेवण्यात आली आहे. तसेच खगोल संशोधनातील टप्पे दाखविणारी पोस्टर्स, नकाशे, विविध ग्रह-ताºयांवरील आपले वजन मोजण्याची सुविधादेखील येथे आहे.विज्ञानपे्रमींसाठी पर्वणीसर्व अत्याधुनिक यंत्र व सुविधांनी सुसज्ज असे हे केंद्र मराठवाड्यातील विज्ञानपे्रमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. विद्यार्थी व सामान्य लोकांमध्ये विज्ञानाप्रती रुची वाढविण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि कोर्स आयोजित केले जातील.-श्रीनिवास औंधकर, संचालक,एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब