लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या गोंधळी कारभाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. पहिल्या यादीत पात्र ठरविलेल्या प्राध्यापकांना दुसºया यादीत अपात्र ठरविण्यात आले. मात्र, संघटनांनी आक्रमक पवित्रा घेताच पहिल्या यादीतील सर्व पात्र, तदर्थ प्राध्यापक, महिला प्राध्यापकासंबंधित पुरावे ग्राह्य धरत त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यास होकार दिला. यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा तोंडघशी पडावेलागले.विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यात प्राध्यापक, प्राचार्य, विभागप्रमुख आणि संस्थाचालक गटाच्या मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. पहिल्या मतदार यादीमध्ये पात्र ठरलेल्या प्राध्यापकांना दुसºया यादीमध्ये अपात्र ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिका-यांनी घेतला होता. यात महाविद्यालयांतील ६०८ व विद्यापीठांतील ५१ प्राध्यापकांचा समावेश होता. या घडलेल्या प्रकारामुळे प्राध्यापकांच्या संघटना आक्रमक झाल्या.शुक्रवारी विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, बामुक्टो आणि स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या पदाधिका-यांनी कुलगुरूंची भेट घेतली. दोन्ही परस्परविरोधी संघटनांच्या पदाधिका-यांची एकच मागणी असल्यामुळे कुलगुरूंनी वगळलेली सर्व नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या. यात तदर्थ, बाटू विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा समावेश असल्याची माहिती उत्कर्ष पॅनलचे प्रा. सुनील मगरे यांनी दिली. उत्कर्ष पॅनलच्या निवेदनावर प्रा. सुनील मगरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. सुरेश गायकवाड, प्रा. सुनील जाधव, प्रा. भास्कर टेकाळे, प्रा. भारत खैरनार, डॉ. सुनील मेंढे, प्रा. वसंत जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.या निवेदनावर अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. दादासाहेब गजहंस, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. युवराज धबडगे, डॉ. प्रकाश तुरुकमाने, प्रा. मोहन सौंदर्य आणि डॉ. किशोर वाघ यांची स्वाक्षरी आहे.
आधी गोंधळ; नंतर मतदारयादीत दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:29 AM