लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हज यात्रा २०१८ साठी मराठवाड्यातील यात्रेकरूंची रवानगी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून १४६ यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना झाला. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. चिंब डोळ्यांनी यात्रेकरूंना निरोप देण्यात आला. यंदा चिकलठाणा विमानतळावरून रवाना होणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अत्यंत कमी आहे.केंद्र शासनाने यंदापासून हज यात्रेचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे औैरंगाबादहून थेट जेद्दाहपर्यंत जाण्यासाठी यात्रेकरूंना ३० हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:06 AM