शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

रात्री १२ वाजता फटाके फोडल्याचा पहिला गुन्हा हर्सूल ठाण्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 6:41 PM

ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते.

औरंगाबाद : हर्सूल परिसरातील जटवाडा रोडवर एका अपार्टमेंटसमोर बुधवारी रात्री फटाक्यांची आतषबाजी करून अंधारत पसार होणाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते. हर्सूल ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, डीबी पथकप्रमुख कल्याण चाबूकस्वार, सहायक फौजदार उत्तम गिरी, हवालदार शेख महेबूब, शेख शरीफ, बाळासाहेब घोडके हे गस्तीवर असताना त्यांंना जटवाडा रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचा आवाज रात्री १२ वाजेच्या सुमारास ऐकू आल्याने गस्ती पथकाचे वाहन त्या दिशेने गेले. सहारा वैभवसमोर आले असता अंधारात फटाके वाजवून उल्लंघन करणाऱ्यांनी पळ काढला.

परिसरात शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाही. शहरातील इतर ठाण्यांत गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आले नाही. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुन्हे दाखल करण्याचे सुचविल्याने पथक गस्तीवर होते. डीबी पथकाचे कल्याण चाबूकस्वार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. गोरख उबाळे करीत आहेत. 

इतर ठाण्यांत निरंकन्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी चर्चा करून नियमांचे पालन करा, अशा सूचना केल्या होत्या; परंतु दिवाळी सणात सदरील आदेशाचे विविध ठाण्यांच्या हद्दीत उल्लंघन झाले असले तरी दिवाळीच्या धामधुमीत पोलीस कर्मचाऱ्यांनीच कानाडोळा केला की काय, असा संशय स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे. विविध ठाण्यात फटाके फोडण्यावरून वाद हाणामारीचे गुन्हे दाखल झालेले आहेत; परंतु नियमाचे उल्लंघनाचे निरंक असेच उत्तर मिळाले. सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, फटाके फोडल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठाण्यांत अकरा गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठाण्याजवळ फटाके फोडून पलायनदुसऱ्या घटनेत, जिन्सी पोलीस ठाण्याजवळील जिन्सी चौकात १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक जण फटाके वाजवित होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला. त्याचा शोध पथकाने उशिरापर्यंत घेतला; परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी सहायक फौजदार आयुब खान उस्मान खान पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख शकील करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrackersफटाकेPoliceपोलिस