गंगापूर : वर्षभरात मयत झालेल्या पतसंस्थेच्या सभासदांना सुरक्षा ठेवीच्या व्याजातून प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात आली आहे, तसेच येणाऱ्या काळात १५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती गंगापूर शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी दिली.
वर्षभरात संस्थेस एकूण १ कोटी ६३ लाख रुपये नफा झाला असून, सभासद कर्ज १३ लाख रुपये ९.५ टक्के व्याजाने वाटप करण्यात येत आहे. अपघात विमा १५ लाख रुपये काढण्यात आला आहे. लाभांश रोखीने न देता सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यावेळी ज्योती जहागीरदार, बाळू पानकर, राजू बाबर व देवचंद काळुंखे या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली. या काळात गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्र मुख्याध्यापक, उपाध्यक्ष गीता जाधव, राजू गायकवाड, उद्धव बोचरे, ज्योती मारकवाड, प्रभाकर पवार, अनिल काळे, जे.के. चव्हाण, राजेंद्र साळवे, जे.के. राऊत, जगन्नाथ गीते, मच्छिंद्र बडोगे, राजेश हिवाळे, अंकुश जाधव, भगवान हिवाळे, संजय भडके, सतीश कबाडे, राजेंद्र हारदे, कैलास नेटके यांचे सहकार्य लाभले आहे.
----
फोटो :
ज्योती जहागीरदार यांच्या वारसांना मदतीचा धनादेश देताना पतसंस्थेचे पदाधिकारी.
240621\screenshot_20210624-133828_whatsapp_1.jpg
ज्योती जहागीरदार यांच्या वारसांना मदतीचा धनादेश देतांना पतसंस्थेचे पदाधिकारी.