लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७ साठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते़ त्यापैकी २६ आॅगस्टपर्यंत ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे़जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला़ त्यामुळे शेतकºयांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दोन महिन्यांचा खंड दिला़ त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या ठप्प झाल्या होत्या़ त्यानंतर पावसाचे जिल्ह्यामध्ये पुन्हा आगमन झाले़ त्यानंतर जिल्ह्यातील शेतकºयांनी तब्बल ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी केली़ यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकाची २ लाख १७ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे़ त्यापाठोपाठ १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ तुरीची ४७ हजार ५९५ हेक्टरवर लागवड झाली आहे़ उडदाची ९ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ ३५ हजार ६३८ हेक्टर क्षेत्रावर मुगाची तर १ हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे़ परंतु, यातील उडीद व मूग शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत़
सव्वा पाच लाख हेक्टरवर झाली पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:55 PM