शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प ५० टक्केही भरले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:01 PM

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देचार जिल्ह्यात सुरु आहेत ६२१ टँकर १२ लाख ५२ हजार नागरिकांना टँकरने पाणी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत यंदाच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाणीसाठा झालेला नाही. ७ आॅक्टोबर रोजी पावसाळा संपण्याची तारीख आहे. परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्यातील काही भागांत बरसत असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६२१ टँकरने १२ लाख ५२ हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. 

मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. इतकी आहे. ५८८.१५ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे. ७५.५० टक्के पाऊस विभागात झाला आहे. २५ टक्के पावसाची आजवर तूट आहे. विभागातील एकूण सर्व ८७२ प्रकल्पांत ८१९३.९२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ३६९३.२० दलघमी पाणी प्रकल्पांत आहे. ४५.०८ टक्के  इतके ते पाणी आहे. चार जिल्ह्यांतील टँकरचा आकडा पाहता येणाऱ्या उन्हाळ्यात त्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४१३ टँकर सुरू आहेत. लातूरमध्ये ३७, तर उस्मानाबादमध्ये १३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये ३४ टँकर सुरू आहेत. १३२६ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकर सुरू ठेवण्याची परिस्थिती विभागात निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. 

मराठवाड्यातील विविध प्रकल्पांतील साठा

प्रकल्प     संख्या    एकूण क्षमता    सद्य:स्थितीत साठा     टक्केवारी     मोठे प्रकल्प    ११    ५१४३ दलघमी     २८७३ दलघमी     ५५.८६ %मध्यम प्रकल्प    ७५    ९४०.३४    २१५.६९५    २२.९४ %लघु प्रकल्प    ७४९    १७१२.८७    ३६४.५६    २१.२८%गोदावरी बंधारे    १३    ३२४.७७४    २३७.२९०    ७३.६१ %तेरणा व बंधारे     २४    ७२.२३०    २.६५३    ३.६७६ %एकूण     ८७२    ८१९३.९२    ३६९३.२०    ४५.०८ %  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती