ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद/सिल्लोड : रजाळवाडी येथील नवविवाहिता रेखा प्रभाकर हसे (२०) हिने शनिवारी विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोषी असलेल्या तिच्या सासरच्या ५ जणांना सिल्लोड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी रेखाच्या मृत्यू प्रकरणी सुरुवातीला आकस्मात मृत्यु ची नोंद केली होती. परंतु; रेखाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्म हत्या केल्याची तक्रार रेखाचे वडिल नत्थू ब्राह्मणे रा. जांबड़ी ता. कन्नड़ यांनी केली. यावरून पोलिसांनी दगडुबा महादेव हसे, ध्रुपताबाई दगडुबा हासे, भगवान दगडुबा हसे, सीमा भगवान हसे, प्रभाकर दगडुबा हसे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
माहेरी पाठविलेच नाही
रेखा चे लग्न 18 में 2017 रोजी प्रभाकर हसे याच्यासोबत झाले होते. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी तिला सतत मुंबई येथे फ्लैट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले. याच दरम्यान लग्न झाल्यापासून तिला एकदाही माहेरी पाठवण्यात आले नव्हते तसेच तिच्या पतीने दुसरे लग्न करण्याची धमकीही तील दिली होती असे रेखाच्या वडिलांनी सांगितले.