फिक्सर ग्रेडेड प्लास्टर वाळू आता ४० किलो पॅक गोणीमध्ये उपलब्ध झाली आहे. जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या अजमेरा मार्बल अँड टाईल्स यांनी बाजरात आणली आहे. काळ्या व पांढऱ्या दगडापासून बनविलेल्या फिक्सर ग्रेडेड प्लास्टर वाळूचे लॉंचिंग न्या. के. यू. चांदीवाल, क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्र जबिंदा, सचिव सुनील बेदमुथा, नीलेश अग्रवाल, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अजमेरा मार्बलचे मालक प्रकाश अजमेरा यांनी सांगितले की, या वाळूचा वापर होताना पैशांची व वेळेची बचत होणार आहे. अति सुंदर फिनिशिंग व स्मूथ ही वाळू आहे. ही वाळू प्लास्टर आतून व बाहेरून करण्यासाठी आणि सिलिंग प्लास्टरसाठी अत्यंत मजबूत आहे. वाळू चाळण्याची गरज नाही त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च वाचतो. इकोफ्रेंडली प्लास्टर होऊन व इटरलॉकिंग प्लास्टर होते आणि भविष्यात तडे जाण्याची शक्यता कमी असते. या ६ गोणी वाळूमध्ये १ गोणी सिमेंट मिक्स करून १४० ते १५० स्के. फूट प्लास्टर होते, अशी वैशिष्ट्ये त्यांनी नमूद केले. यावेळी नितीन अजमेरा, आकाश अजमेरा याची उपस्थिती होती.
फिक्सर ग्रेडेड प्लास्टर वाळू ४० किलो गोणीत उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:04 AM