बीड : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणार्या एसटीला रविवारी ६६ वर्ष पूर्ण झाली. एसटीच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे रविवारी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात सनईचे सुरांचा मंद आवाज प्रवाशांच्या कानावर पडत होता. बसस्थानकातील आकर्षक व स्वच्छ वातावरणामुळे बसस्थानके फुलून गेली होती. रविवारी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बीड बसस्थानकातही कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक, वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, आगार प्रमुख ए.यु.पठाण, भांडार अधिकारी चव्हाण, कुमार शिरशीकर, उपयंत्र अभियंता लांडगे, वाहतूक नियंत्रक एस.एन. महाजन, बाबा गर्कळ, एस.एच.कराड, स्थानकप्रमुख देशपांडे, बनसोडे, सत्तार भाई, नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक रेड्डी, नियंत्रक नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महामंडळातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आगारप्रमुख पठाण यांनी केले. यांचा झाला सत्कार इंधन बचत करणारे चालक एस.के. रणदीवे, जी.बी. तांदळे, एम.ए.शेख, जास्त उत्पन्न आणणारे वाहक आर. एम.घोडके, व्ही.एम.मगर, आय.के.शेख तर उत्कृष्ट अभियांत्रिकी म्हणून आर.व्ही.वंजारे, एन.पी.बारगजे, एच.डी.गल्लाळ यांचा अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बसस्थानकांचे रूपडेच बदलले एरवी घाण दिसणारे बसस्थानके रविवारी स्वच्छ व आकर्षक दिसून आली. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर केळीचे व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. आलेल्या प्रवाशांचे फुल देऊन सत्कार करण्यात आले. तसेच स्थानकांच्या दारावर रांगोळी काढल्याने हे अधिकच आकर्षक दिसत होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामंडळाच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. स्थानकात येताच सनईचे सूर ऐकावयास मिळाले.
बसस्थानकांमध्ये घुमले सनईचे सूर
By admin | Published: June 01, 2014 11:53 PM