शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

लग्नाकार्यात रूजतोय ‘फ्लॉवर पॅटर्न’चा ट्रेंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:10 PM

अबोली कुलकर्णी औरंगाबाद : लग्नकार्य म्हटल्यावर बँड, बाजा आणि वºहाडींसोबत लक्षवेधी ठरते ती आकर्षक फुलांची सजावट. विविधरंगी असलेली ही ...

ठळक मुद्देसजावट : आॅर्चिड, ट्युलिप्स, अँथ्रेम फुलांचे वाढले भाव; ‘सायकल सेल्फी पॉइंट’ला विशेष पसंती

अबोली कुलकर्णीऔरंगाबाद : लग्नकार्य म्हटल्यावर बँड, बाजा आणि वºहाडींसोबत लक्षवेधी ठरते ती आकर्षक फुलांची सजावट. विविधरंगी असलेली ही फुले आमंत्रितांच्या स्वागतासाठीच जणू सज्ज असतात. यंदाच्या लग्नसराईत मात्र शहरात एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळाला, तो म्हणजे फुलांच्या आगळ्यावेगळ्या डिझाईन पॅटर्नचा. या पॅटर्नसाठी वापरली जाणारी फुले ही अत्यंत महागडी, विदेशातून आयात केलेली; पण तेवढीच आकर्षक अशी असतात. विशेष म्हणजे अशा पॅटर्नची मागणी आयोजकांकडून करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महागडी फुले आणि हटके पॅटर्न यंदाच्या लग्नसराईतील ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले आहेत.शहरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. घरात लग्नकार्य म्हटले की, विविध प्रकारच्या तयारीला, जमवाजमवीला उधाण येते. नवरदेव-नवरीची तयारी, बस्ता, पाहुण्यांची तयारी, मंगलकार्य ठरवणे अशा एक ना अनेक तयारी करण्यात आयोजक व्यस्त असतात. मात्र, त्यासोबतच महत्त्वाची असते ती मंगलकार्यातील आकर्षक सजावटही. रंगीबेरंगी लायटिंग, आकर्षक फुलांची सजावट हे आमंत्रितांचे लक्ष वेधून घेतात. यंदा लग्नसराईत पाहावयास मिळालेल्या ट्रेंडमध्ये मंगलकार्यातील आमंत्रितांच्या प्रवेशाच्या ठिकाणी रंगीबेरंगी, आकर्षक फुलांचे पॅटर्न बनवून लावण्यात येतात. यात एकप्रकारची थीम असते. ट्युलिप्स (२५० रुपये), अँथ्रेम (७० रुपये), आॅर्चिड (८० रुपये), निलम (१५० ते २०० रुपये) किसानमुंत्री (९० रुपये) अशी महागडी फुले वापरली जातात. त्यासोबतच काही ठिकाणी फुलांचे स्टॅण्डस् बनवले जातात. तसेच ‘सायकल सेल्फी पॉइंट’ बनवून तिथेदेखील अशाच आकर्षक फुलांसह सजावट केली जाते. लग्नात सहभागी झालेल्या युवा, महिला आणि इतर मंडळींना तेथे जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटता येते. या पॅटर्नच्या फुलांमध्ये आॅर्चिड, ट्युलिप्स, अँथ्रेम यासारखी महागडी फुले वापरली जातात. जेवढी ही फुले महाग तेवढी प्रतिष्ठेत भर पडते, अशी ग्राहकांची मानसिकता असते. त्यामुळे ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही या नव्या ट्रेंडला पाहू लागले आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय