शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

वाहता नाला झाला नदीसारखा आरस्पानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:15 AM

इंदूर झाले चकाचक; औरंगाबाद का नाही : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते.

ठळक मुद्देजागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा इंदूर शहरात उपलब्ध करून देण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. क्लिअर किरणोत्सर्गाचा वापर करून मानवी विष्ठेपासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

मुजीब देवणीकरऔरंगाबाद : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते. न्यूक्लिअर किरणोत्सर्गाचा वापर करून मानवी विष्ठेपासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा इंदूर शहरात उपलब्ध करून देण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. शहर बससेवा, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, पथदिवे, गुळगुळीत रस्ते, पदपथ, उद्याने, प्राणिसंग्रहालय, ठिकठिकाणी बागा, जागा मिळेल तेथे वृक्षारोपण, मानवी केसांपासून केमिकल खतनिर्मिती, अशा कितीतरी आघाड्यांवर महापालिका काम करीत आहे. ही कामे महापालिका कशी करीत असेल, असाही क्षणभर प्रश्न पडतो. या कामासाठी खूप पैसा लागतो असेही नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप तयार होतात, हे इंदूर शहराने दाखवून दिले.

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

शहरातील कबीरखेडी येथे तब्बल ३०० एमएलडी दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी शहरातील उद्याने हिरवीगार करण्यासाठी वापरण्यात येते. २० कोटी रुपये खर्च करून भाभा अणु संशोधन केंद्राच्या मदतीने मानवी विष्ठेपासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. अहमदाबादनंतर हे देशातील दुसरे केंद्र ठरणार आहे.

दर्जेदार पाणीपुरवठाइंदूर शहरात पाण्यासाठी नर्मदा नदीवर अवलंबून राहावे लागते. तब्बल ९० किलोमीटर अंतरावरून पाणी शहरात आणण्यात येते. शहरातील उंच टेकडीवर हे पाणी नेण्यात येते. तेथून कोणतेही पंपिंग न करता थेट पाणी टाक्यांमध्ये चढविण्यात येते. शहराचे दोन भाग केले असून, प्रत्येक भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या अद्भुत पद्धतीने पाणीपुरवठ्यातील विजेचा खर्च कमी झाला आहे. औरंगाबादेतील नहर-ए-अंबरीसाठी ही सायफन पद्धत वापरली आहे.

३५० सुलभ शौचालयेइंदूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर ‘पेशाब घर’ म्हणजेच शौचालये दिसतात. खाजगी संस्थांच्या माध्यमातून ‘पे अँड युज’ शौचालये उभारण्यात आली आहेत. नागरिक, महिला याचा वापर करतात. महापालिका दररोज स्वच्छता करते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने दर्जेदार सोयी-सुविधा देऊन नागरिकांच्या मनात घर केले. आता सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकला तर नागरिकच त्याला रोखतात. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाही नागरिकच धडा शिकवितात.

२०० बसथांबेशहर बससेवेसाठी मनपाने प्रमुख रस्त्यांवर  आकर्षक बसथांबे तयार केले . यामध्ये बस किती वाजता येईल, याच्या वेळा डिजिटल बोर्डावर दर्शविण्यात आल्या आहेत. बस येण्यास किती वेळ आहे, हेसुद्धा प्रवाशाला पाहायला मिळते. बसथांब्यांची बांधणी अ‍ॅक्रलिक बोर्डात केली आहे. हे अ‍ॅक्रलिक बोर्ड कोणी चोरून नेत नाही, हे विशेष. महापालिकेने लावलेली प्रत्येक वस्तू ही या शहराची आहे. याचा वापर आपल्याला करावा लागतो ही जपानी नागरिकांप्रमाणे भावना प्रत्येकाच्या मनात कोरण्यात आली .

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानwater pollutionजल प्रदूषणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका