छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यातील शेवटचा आठवडा एकदम 'हॉट' जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ वर्तवित आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवार २१ मेपासून तापमानात चढ-उतार होत आहे. २३ मे रोजी पाच वर्षांतील तापमानाने रेकॉर्ड मोडले. त्यानंतर तापमान वाढतेच असून रविवारी तापमान ४१.८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस होते. उकाडा कायम असल्यामुळे रविवारी रस्त्यावरील गर्दी तुरळक होती. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात बहुतांश ठिकाणी कमी वर्दळ असल्याचे आढळले.
मंगळवार, २१ मे रोजी कमाल तापमानाचा पारा ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला, बुधवारी ४१.४ अंश सेल्सिअस तर गुरुवारी ४३.५ अंश सेल्सिअसइतके तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदविले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक जास्त तापमानाची नाेंद गुरुवारी झाली. शुक्रवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानामुळे नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.
यंदाच्या उन्हाळ्यातील वाढलेले तापमान५ एप्रिल : ४१.६ अंश सेल्सिअस१८ एप्रिल : ४२.२ अंश सेल्सिअस५ मे : ४१.६ अंश सेल्सिअस६ मे : ४१.२ अंश सेल्सिअस२१ मे : ४१.६ अंश सेल्सिअस२२ मे : ४१.४ अंश सेल्सिअस२३ मे : ४३.५ अंश सेल्सिअस२४ मे: ४३.४ अंश सेल्सिअस२५ मे: ४२.८ अंश सेल्सिअस२६ मे: ४१.८ अंश सेल्सिअस
१३ दिवस ४० ते ४१ अंश सेल्सिअस ....१ मार्च रोजी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान होते. ११ मार्चपर्यंत तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. ३१ मार्चपर्यंत ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले.१ एप्रिल रोजी ३८.८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. १६ एप्रिल रोजी ४०.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला. १८ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यानंतर २९ एप्रिल रोजी ४१.४ अंश सेल्सिअस तापमान गेले. ४ मेपासून पुन्हा तापमान ४१.६ अंश सेल्सिअस पुढे गेले. १८ मेपर्यंत तापमानात चढ-उतार राहिला. १३ दिवस तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.