- संतोष हिरेमठऔरंगाबाद : फ्लायबिग एअरलाइन्सची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा अचानकपणे दीड महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. विमान चेकिंगसाठी गेल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती फ्लायबिग एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.
औरंगाबादहून १ जून रोजी फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला हैदराबादला जाणे शक्य झाले. या नव्या विमानसेवेमुळे आता सकाळी हैदराबादला जाऊन सायंकाळी औरंगाबादला परत येणे शक्य झाले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांनंतर ही विमानसेवा अचानक रद्द करण्यात आली आहे. नियमित तपासणीसाठी विमान कर्नाटकातील ‘एमआरओ’ येथे पाठविण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात विमान रद्द केले आहे, असे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.