शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कापड व्यावसायिकांची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:04 AM

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांची आर्थिक घडी मोडली आहे. १ जूनपासून दुकाने उघडली नाहीत तर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांची आर्थिक घडी मोडली आहे. १ जूनपासून दुकाने उघडली नाहीत तर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने येत्या काळात २५० पेक्षा अधिक लहान दुकानदार दुकाने खाली करतील. जिल्ह्यात ३ हजार कापड दुकाने असून, त्यावर ५० हजार कर्मचारी अवलंबून आहेत. या सर्वांचा जगण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

कापड व्यापाऱ्यांसाठी मार्च ते मे हा काळ महत्त्वाचा असतो. याच काळात लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षयतृतीया व रमजान ईद हे महत्त्वाचे सण येतात. त्याशिवाय भगवान महावीर जन्मोत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कपड्यांची विक्री होते. उन्हाळा असल्याने व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीत कॉटन व अन्य कपडे मागविले होते. देशभरातून नवीन फॅशनेबल कोट्यवधीचे कपडे शहरात दाखल झाले होते. त्यातील ९० टक्के कपडे पडून आहेत.

दोन महिन्यांपासून शोरूम बंद असल्याने कपड्यांची घडी मोडता आली नाही. यामुळे कपड्यांवर धूळ साठणे, ते फिके पडणे, घडीवर धुळीची रेष उमटणे असे नुकसान झाले आहे. याशिवाय उंदीर, घुशींनी कपड्यांचे काय हाल केले असतील हे आता दुकाने उघडल्यावरच समजणार आहे. कापड व्यापारी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिथे उलाढाल अधिक असते त्या दुकानात कर्मचाऱ्यांना कमिशन दिले जाते. ते कमिशनही बुडाले. एकूणच संपूर्ण कापड व्यवसाय ‘आर्थिक संकटात’ सापडला आहे. १ जूनपासून दररोज ४ ते ८ तास शोरूम उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कापड व्यापारी संघटनेतर्फे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

चौकट

हातगाडीसमोर १० ते १५ लोक उभे असतात. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत नाही. मात्र, १० हजार स्केअर फुटच्या शोरूममध्ये १० ग्राहक अंतर ठेवून व सर्व सरकारी नियम पाळून बसले तरी त्यामुळे कसा काय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, असा सवाल कापड व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

(चौकट )

५० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न

जिल्ह्यात लहान मोठी ३ हजार कापड दुकाने आहेत. त्यातील १५०० दुकाने शहरात आहेत. यावर ५० हजार कर्मचारी व त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. लॉकडाऊन वाढले तर कर्मचाऱ्यांचा पगार कुठून देणार. कारण, आता व्यापारीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुकाने उघडली नाहीत तर लहान मध्यम आकारातील २५० पेक्षा जास्त दुकाने बंद पडतील.

विनोद लोया

अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

--

कोट्यवधींचे कपडे पुढील वर्षापर्यंत सांभाळावे लागणार

उन्हाळ्यासाठी नवीन फॅशनेबल कॉटनचे कपडे ऑर्डर देऊन मागविले होते. लॉकडाऊनमुळे हे कोट्यवधींचे कपडे पुढील हंगामात विक्री करावे लागतील. तोपर्यंत नवीन फॅशन येते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे ईद सण होता. मात्र, तो व्यवसाय बुडाला. आम्ही उलाढालीत ४ वर्षे मागे फेकले गेलो आहोत. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढील ४ ते ५ वर्षे लागतील.

हरमीतसिंग, संचालक, ट्रेंझ

---

पाणी डोक्यावरून गेले

२ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मागील वर्षातील दोन ते तीन महिने सोडले तर लॉकडाऊनच होते. किती दिवस घरी बसून राहणार. व्यापारी कर्जात व विविध विमाच्या हप्त्यात एवढा बुडाला आहे की, आता पाणी डोक्यावरून गेले आहे. दुकान उघडण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही.

किशोर काल्डा

संचालक, राजदरबार

---

१ जूनपासून शोरूम उघडणे आवश्यक

आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी झाली आहे. यामुळे सरकारी नियम पाळत १ जूनपासून कपड्यांचीच नव्हे तर सर्व दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी. तसे न केल्यास कापड व्यावसायिकांना विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करणे अत्यंत अवघड होऊन बसेल. कारण, व्यावसायिक वाचले तरच देशाची अर्थव्यवस्था वाचेल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

संदीप अग्रवाल

संचालक, आकर्षण