शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन

By राम शिनगारे | Published: December 22, 2023 1:02 PM

अहमदनगर येथे प्राणज्योत मालवली; डॉ. प्रभाकर मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता. 

छत्रपती संभाजीनगर : लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे (९०, ह.मु. अहमदनगर) यांचे गुरुवारी (दि.२१) सायंकाळी अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर नगर येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक, लोकसाहित्याचे संशोधक, समीक्षक आणि व्यासंगी वक्ते अशी त्यांची ओळख होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेड गावात १६ डिसेंबर १९३३ रोजी डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म झाला. शिक्षक असतानाच त्यांनी ‘कन्नड तालुक्यातील लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवली होती. या प्रबंधावरील ‘कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात अध्यापन करीत असतानाच १९७३ मध्ये ते प्रसिद्ध समीक्षक वा.ल. कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. विद्यापीठात १९९३ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनात एकवीस विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन केले. मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता. 

लोकसाहित्य संशोधनाला व्यापक करण्यासाठी त्यांनी ‘लोकसाहित्य परिषद’ स्थापन करून समकालीन संशोधकांसह चळवळ राबविली. त्यांनी उपासनाप्रधान व रंजनप्रधान लोकगायकी परंपरेची विस्तृत मांडणी केली. भेदीक कवनांच्या परंपरांचे विश्लेषण केले. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक लोकपरंपरा पहिल्यांदाच अभ्यासल्या गेल्या. लोकसाहित्य संकलनातही त्यांनी भरीव काम केले. ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकरंगभूमी : परंपरा, स्वरूप आणि भवितव्य’, ‘एक होता राजा’, ‘लोकरंगभूमी’, ‘लोकसाहित्याचे अंत:प्रवाह’, ‘गावगाड्याबाहेर’, ‘लोकनायकांची परंपरा’, ‘लोकरंगधारा’, ‘लोकपरंपरेतील खेळ’, ‘मांग आणि त्यांचे मागते’, ‘लोकपरंपरेतील शहाणपण’, ‘उपेक्षित पर्व’, ‘आदिवासी मूलत: हिंदूच’, ‘बिल्वदल’, ‘दलित साहित्याचे निराळेपण’ हे आदी विपुल ग्रंथांचे लेखन केले.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानितडॉ. प्रभाकर मांडे यांनी २००७ मधील मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. तसेच, अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी दोन वेळा भूषविले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावर्षीच त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. त्याशिवाय इतरही शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

२२ जुलै रोजी अखेरचा सार्वजनिक कार्यक्रमडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पद्मश्रींचा गौरव सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉ. प्रभाकर मांडे यांनाही सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी आयुष्यात जे जे दिसलं, मनाला भावलं ते शब्दातून मांडलं, याचा एवढा मोठा गौरव झाला. नागसेनवनातील शिक्षणाला हा गौरव सर्मपित करतो, असे डॉ. प्रभाकर मांडे म्हणाले हाेते.

...अन् बाबासाहेबांची भेट झालीमहाविद्यालयीन जीवनापासूनच डॉ. मांडे यांना संशोधनाची आवड होती. त्यांनी मध्वमुनीश्वर यांच्या चरित्रावर संशोधन लेख लिहिला होता. हा लेख मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य म.भी. चिटणीस यांना दाखवला. त्यांना तो खूप भावला. त्यामुळे त्यांनी मांडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला नेले. डॉ. आंबेडकरांनी त्या लेखाचे कौतुक केले व ‘असाच अभ्यास करत राहा, शोध घेत राहा’, असा आशीर्वाद दिला होता.

लोकसाहित्याचा भीष्माचार्य हरपलाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या जडणघडणीत पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांनी मोठे योगदान दिले. वा. लं. कुलकर्णी यांच्याप्रमाणेच मांडे सर यांनीही अल्पावधीत छाप उमटविली. परंपरा म्हणजे बुरसटलेपण नसून इथल्याच भूमीचे संचित असल्याचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद लोकसाहित्याचे संशोधक म्हणून त्यांनी केला. त्या पिढीतील अग्रणी संशोधक, साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे होते. त्यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन या क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा निर्माण झाला. त्यांच्या रुपाने लोकसाहित्याचा भीष्माचार्य हरपला आहे.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ .

लोकसाहित्याचा प्राण जाणं इतकं ते दु:खद अलक्षित अशा लोकसाहित्याचा शोध आणि वेध घेणाऱ्या डॉ. प्रभाकर मांडे यांचं निर्वाण ही अत्यंत दु:खद अशी घटना आहे. डॉ. प्रभाकर मांडे यांनी गावगाडा स्थिरावलेल्या लोकवाड:मयाचा जसा पराकाष्टेने शोध घेतला. तसा अस्थिर असलेल्या भटका, विमुक्तांचा लोक वाड:मयाचा आत्मियतेने शोध घेतला. त्यांचे अलक्षित जीवन मराठी वाड:मयाचा अविलग भाग बनविला. त्यांनी अलक्षित अशा समाज समूहाच्या बोलींचा घेतलेला शोध हा मराठी वाड:मयाचा इतिहास विसरू शकत नाही. गुरूवर्य डॉ. मांडे यांचे निर्वाण म्हणजे लोकसाहित्याचा प्राण जाणं इतकं ते दु:खद आहे.- डॉ. ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक.

लोकसाहित्याचा अभ्यासक हरपलापद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे हे पहिल्या पिढीतील लोकवाङ्मय, लोकसंस्कृती, जातसंस्कृतीचे अभ्यासक होते. मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्यानंतर त्यांनी लोकसाहित्याला एक दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मराठवाड्यात लोकसाहित्याचे अनेक अभ्यासक घडले. त्यांच्या निधनामुळे लोकसाहित्याचा अभ्यासक हरपला.-प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद.

व्यासंगी अभ्यासक गेलाडॉ. प्रभाकर मांडे हे मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे अभ्यासक होते. लोकसाहित्याच्या अभ्यासकांत दुर्गा भागवत, सरोजनी बाबर नंतर त्यांचेच नाव महत्त्वाचे आहे. लोकसाहित्य ते लोककथा, लोकगीते यांचा त्यांनी केलेला अभ्यास आजही त्यांच्या विद्यार्थ्यांना पुढे नेता आला नाही. गोदावरी नदीच्या परिसरात त्यांनी केलेला लोकसाहित्याचा अभ्यास एकमेव असा आहे. त्यांच्या निधनाने लोकसाहित्याचा एक चालता, बोलता व्यासंगी अभ्यासक गेला.- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद.

अतिशय तन्मयतेने वर्गात शिकवितमाझ्यासह आणि अनेक विद्यार्थ्यांच्या सुदैवाने आम्ही सगळे गुरुवर्य डाॅ. मांडे सर यांचे विद्यार्थी राहिलो आहे. त्यांचे निधन आमच्यासाठी धक्कादायक आहे. ते अतिशय तन्मयतेने वर्गात शिकवित असत. लोकसाहित्याचे थोर संशोधक म्हणून त्यांचा संपूर्ण देशात लौकिक होता. लोकसाहित्याचे मूलभूत संशोधन फार कमी अभ्यासकांनी केले आहे, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ठाऊक होते. जे कायम मनात असतात ते कधीच जात नसतात. त्यांची आता प्रत्यक्ष भेट होणार नाही, पण ते कायम आमच्या मनात असतील.- फ. मु. शिंदे, ज्येष्ठ कवी.

नामवंत शिक्षक म्हणून लौकिकडॉ. प्रभाकर मांडे हे लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. लोकसाहित्याची सैद्धांतिक मांडणी करणारे एक संशोधक होते. भटक्या विमुक्त जातीच्या समाजाचे चित्रण त्यांनी केले. त्यांच्या भाषा त्यांनी मराठीत पहिल्यांदा उकलून दाखविल्या. त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात त्यांनी मध्ययुगीन पोथ्या गोळा केल्या. मराठी विभागातील पोथी शाळा उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. विद्यापीठात अधिव्याख्याता, प्रपाठक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम केले. नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.-डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक.

व्यासंगी विद्वान शिक्षक हरपलापद्मश्री गुरुवर्य प्रभाकर मांडे म्हणजे एक व्यासंगी विद्वान शिक्षक, लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक म्हणून सुदूर परिचित आहेत. प्रत्यक्ष गावोगाव फिरून सरांनी केलेले संशोधन, अभ्यास आजही मौलिक आहे. सरांचे ग्रंथ अभ्यासल्याशिवाय आजही लोकसाहित्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. लोकसाहित्य ही अभ्यासपत्रिका विद्यापीठीय पातळीवर सुरू करण्यात सरांचे मोठे योगदान आहे. शेवटपर्यंत लोकसाहित्य चिंतन हाच त्यांचा ध्यास होता. सरांना विनम्र श्रद्धांजली.-- डॉ. दासू वैद्य, मराठी विभागप्रमुख

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रliteratureसाहित्य