लोकमत न्यूज नेटवर्कऔरंंगाबाद : वैद्यकीय व्यवसाय हा सन्मानाचा व्यवसाय आहे. नीतिमत्ता पाळून हा सन्मान मिळविण्याची जबाबदारी ही नवीन डॉक्टरांची असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले.शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाच्या (घाटी) वर्ष २०१२ च्या बॅचचा पदवीदान समारंभ सोमवारी (दि.१२) महात्मा गांधी सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. येळीकर बोलत होत्या. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. सरोजिनी जाधव,डॉ. मीनाक्षी भट्टाचार्या, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजन बिंदू, डॉ. के. टी. जैन, डॉ. कैलास झिने, डॉ. सईदा अफरोज, डॉ. सी. आर. थोरात, डॉ. जिरवणकर, डॉ. वैशाली उणे, डॉ. प्रभा खैरे यांची उपस्थिती होती.डॉ. येळीकर म्हणाल्या, वैद्यकीय शिक्षण हे अत्यंत खडतर असून विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही. वैद्यकीय व्यवसाय असा आहे की, ज्यामुळे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर हजर राहावे लागते. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी आई-वडील, महाविद्यालयातील प्राध्यापकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या.पदवीदान समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. पदवीदान समारंभानिमित्त महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. पदवीसोबत, वर्गमित्रांसोबत छायाचित्र, सेल्फी काढण्यात विद्यार्थी म्हणजे नवे डॉक्टर हरवून गेले होते.१४० विद्यार्थ्यांना पदवीदानवर्ष २०१२ मध्ये महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणांनतर एक वर्षाच्या इंटर्नशिप पूर्ण केलेल्यांचा पदवीदान समारंभ झाला. यामध्ये जवळपास १४० विद्यार्थ्यांना अधिष्ठाता आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले. २०१३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वैद्यकीय व्यवसायातील नीतिमत्ता पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:26 AM
वैद्यकीय व्यवसाय हा सन्मानाचा व्यवसाय आहे. नीतिमत्ता पाळून हा सन्मान मिळविण्याची जबाबदारी ही नवीन डॉक्टरांची असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले.
ठळक मुद्देकानन येळीकर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात