शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

विद्यार्थ्यांची सुरक्षा: ठाण्याच्या हद्दीतील शाळा पोलिस अधिकारी, अंमलदारांना दिल्या दत्तक

By सुमित डोळे | Published: October 14, 2024 6:58 PM

सातारा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : शाळेच्या आवारात तक्रारींसाठी स्कॅन कोड, तक्रार पेटी, अंमलदार करणार नियमित पाहणी

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा प्रत्येक अंमलदाराला दत्तक देण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये एक तक्रार पेटी, आवारात स्कॅन कोड बसविण्यात आला असून हे अंमलदार नियमित शाळेला भेट देऊन पेटी तपासतील. त्याशिवाय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सातारा पोलिसांनी गेल्या सात दिवसांपासून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महिला, तरुणींसोबत छेडछाड, अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली. यात शाळकरी मुलींवर अत्याचार, छेड, पाठलाग करुन त्रास देण्याच्या तक्रारी वाढल्या. बदलापूर पाठोपाठ माजलगावात शाळेतील व्यक्तीने अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. त्यानंतर पोलिस विभागही सतर्क झाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकतेच पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्वच ठाण्यांमधून अधिकारी, अंमलदारांनी शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. मुख्याध्यापक, शिक्षक, वाहनचालक, मालकांना सक्त सूचना केल्या.

सातारा परिसरातील १२२ शाळा, कॉलेजात उपक्रमपोलिस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील यांनी शाळांच्या भेटी, चर्चाच्या नियमित उपक्रमासोबत सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगळ्या उपाययाेजना राबवण्याचे ठरवले. या परिसरात एकूण १२२ लहान मोठ्या शाळा, महाविद्यालय आहेत. प्रत्येक ठिकाणी स्कॅन कोड, तक्रार पेटी बसवल्या. त्यासोबत प्रमुख ५७ शाळा, महाविद्यालय एका अंमलदाराला दत्तक दिले. प्रत्येकी ८ ते १० शाळांची जबाबदारी एका सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकावर असेल, असे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी सांगितले.

अंमलदाराच्या प्रमुख जबाबदाऱ्या अशा :- शाळा, महाविद्यालयातील अभिप्राय बुक रजिस्टर तपासणे.- सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही, याची तपासणी करावी.- तक्रार पेटीत तक्रार येताच वरिष्ठांना कळवून चौकशी करावी.- स्कॅन कोडच्या तक्रारी थेट पोलिस उपायुक्त कार्यालयाला पोहोचतील. तेथून संबंधित अंमलदार, अधिकाऱ्याला कळवले जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रPoliceपोलिस