शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धमकावत घराबाहेर नेत, ५० वेळा केला अत्याचार; अल्पवयीन पीडितेची धक्कादायक माहिती

By सुमित डोळे | Published: June 14, 2023 1:43 PM

अत्याचारात अपहरणासाठी वापरलेली कार पोलिसांकडून डोणगाव तांड्यावरून जप्त

छत्रपती संभाजीनगर : रात्री अपरात्री त्या नराधमांनी मला धमकावून घराबाहेर बोलावले. निर्मनुष्य ठिकाणी नेत ४० ते ५० वेळा अत्याचार केले, अशी धक्कादायक माहिती १४ वर्षीय पीडितेने दिली. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिने ही माहिती दिली. दरम्यान, अत्याचारात वापरलेली कारदेखील सातारा पोलिसांनी जप्त केली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय पूर्वावर (नाव काल्पनिक आहे) सहा जणांनी ऑक्टाेबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान अत्याचार केले. सुरुवातीला विश्वासू मित्राने अत्याचार करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत नात्यातील एका तरुणासह अन्य मित्रांना या क्रूर कृत्यात सहभागी करून घेतले. जवळपास सहा महिने दोन अल्पवयीन मुलांसह सहा मित्रांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. तिला गुुंगी येईपर्यंत नशिली पदार्थांचे सेवन करायला लावले. यात सातारा पोलिसांनी अक्षय चव्हाण (१९, रा. डोणगाव तांडा, ता. पैठण), शेख लतिफ ऊर्फ असीम पठाण (२४, रा. देवळाई) व रामेश्वर गायकवाड (२२, रा. आलोकनगर) यांना अटक केली, तर अल्पवयीन आरोपींची बालगृहात रवानगी केली.

सध्या शासकीय बालगृहात असलेल्या पीडितेचा पोलिस जबाब नोंदवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल तपासणीदरम्यान तिने अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या. तिच्यावर सहा नराधमांनी ४० ते ५० वेळा अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलिस आता त्या दृष्टीने तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. तिने सांगितलेल्या सर्व ठिकाणांवर पोलिसांनी पाहणीदेखील केली. या गुन्ह्यात अक्षय त्याची कार वापरत होता. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी त्याच्या गावातून कार जप्त केली. देवळाईतील लतिफचा मित्र अद्याप फरार असून पोलिसांचे एक पथक जिल्ह्याबाहेर त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळ