औरंगाबाद : राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी-सुविधा अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी ६० पर्यटक औरंगाबादेत दाखल झाले. रेल्वेस्टेशनवर औरंगाबादची प्रसिद्ध इम्रती देऊन या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. पर्यटकांनी इम्रतीचा मनमुराद आस्वाद घेतला.रेल्वेस्टेशनवर आगमन झाल्यानंतर दुपारी दीड वाजता पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या रेल्वेने आलेल्या पर्यटकांना पहिल्यांदाच औरंगाबादची इम्रती देण्यात आली. इम्रतीचा आस्वाद घेताना पर्यटक आनंदले होते. अनेकांनी हा कोणता पदार्थ आहे, अशी विचारणा केली. औरंगाबादेतील हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. इम्रतीची चव पर्यटकांच्या जिभेवर चांगलीच रेंगाळली होती. यावेळी काहींनी इम्रती खाण्याचा क्षण मोबाईल, कॅमेऱ्यात कैद केला.याप्रसंगी दिलीप खंडेराय आणि त्यांच्या कला पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय जाधव, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंतसिंग यांची यावेळी उपस्थिती होती. विजय जाधव यांनी पर्यटकांना इम्रतीसह राज्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तिका दिली. रेल्वेस्टेशनवर झालेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने पर्यटक भारावून गेले. त्यानंतर पर्यटकांनी वेरूळ लेणी येथे भेट दिली.पर्यटकांनी दिली साथदिलीप खंडेराय कला पथकाकडून सादरीकरण सुरू असताना एका पर्यटकाचा पाय लागून ध्वनियंत्रणा बंद पडली. परंतु या प्रकारानंतर उपस्थित पर्यटकांनी टाळ्यांची साथ देत कलावंतांना सादरीकरणासाठी प्रोत्साहन दिले.
परदेशी पर्यटकांनी घेतला इम्रतीचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:21 PM
राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी-सुविधा अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी ६० पर्यटक औरंगाबादेत दाखल झाले. रेल्वेस्टेशनवर औरंगाबादची प्रसिद्ध इम्रती देऊन या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. पर्यटकांनी इम्रतीचा मनमुराद आस्वाद घेतला.
ठळक मुद्दे डेक्कन ओडिसी : विविध देशांतील पर्यटक दाखल