शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

छत्रपती संभाजीनगरात वनविभाग आणि बिबट्याचा लपंडाव सुरूच

By साहेबराव हिवराळे | Published: July 20, 2024 7:08 PM

पिंजऱ्यांना बिबट्याची हुलकावणी, एरव्ही विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंडे बंद

छत्रपती संभाजीनगर : वनविभागाने उल्कानगरी, शंभूनगर, प्रोझोन मॉल व एस.टी. वर्कशॉप आणि स्मशानभूमीसह ५ पिंजरे लावले. पण, बिबट हुलकावणी देत असल्याने वनविभाग आणि रेस्क्यू टीमचीही सोमवारपासून धावपळ सुरू आहे. प्रोझोन मॉल परिसरातून बिबट्याचे अखेरचे फुटेज बुधवारी पहाटे ४.१९ वा. एन-१ सिडको परिसरातील आहे. त्यामुळे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.

बिबट्याच्या भटकंतीत कुत्रे आणि डुकरांचा फडशा पाडलेले चित्रीकरणही वनविभाग तसेच नागरिकांना मिळाले आहे. शंभूनगर पोद्दार शाळेच्या मागे लावलेल्या बिबट्याचे फोटो देखील नागरिकांनी पाहिले असून, पिंजऱ्यात आमिष म्हणून कोंडलेल्या बकऱ्यांची मात्र ‘म्याऽऽ म्याऽऽ’ अशी ओरड सुरूच आहे. लाईनमन दत्ता ढगे यांना सर्वप्रथम बिबट दिसला. आधी वनविभाग हे मान्य करत नव्हता. अखेर फुटेज दिसले. मग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला आणि मंगळवारी जुन्नरचे रेस्क्यू पथक बोलावून दोन पिंजरे लावले. शहर परिसरात १६ वेगवेगळ्या टीम लक्ष ठेवून आहेत.

अनेक फेक व्हिडीओ व फोटो व्हायरल...बीड बायपास, रेल्वे स्टेशन, काबरानगर, एन-८, देवळाई, उल्कानगरी गोशाळा, एन-१ सिडको इ. भागांच्या नावावर खोटे व चुकीचे व्हिडीओ टाकले जात आहेत. एन-१ सिडको परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आली.

कॅमेऱ्यांचीही पिंजऱ्यावर नजर...ज्या ठिकाणी पिंजरे लावले, त्यास ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी. ७, वनपाल व वनरक्षक ५५ आणि इको, बटालियनचे ६, रेस्क्यू टीम, जुन्नरचे ३, असे एकूण ७१, अधिकारी व कर्मचारी गस्तीवर आहेत. गस्तीसाठी त्यांच्या १६ टीम तयार करण्यात आलेल्या आहेत.- सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग

जनतेला भयभीत करू नका...कोणतीही माहिती नसताना चुकीचे व्हिडीओ पाठवून नागरिकांना भयभीत करण्याचा प्रकार थांबवा. अद्याप काहीही अनुचित घडलेले नाही. फक्त सत्य फोटो व व्हिडीओ टाकल्यास मदत होईल. वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

कुत्रे भुंकेना, अगदी चिडीचूप !-कोणास ठाऊक दोन दिवसांपासून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत नाही. एन- १ परिसरात शांतता आहे.-तुकाराम जानराव, सुरक्षारक्षक

वर्दळ कमी झाली रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, वनविभाग पथकाच्या फेऱ्या वाढल्या आहेत.-सुनील घोरपडे, सुरक्षारक्षक

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग