बाजारसावंगी परिसरातील दरेगाव, कनकशीळ, लोणी, बोडखा, सावखेडा, तीसगाव, धामणगाव, विरमगाव, ताजनापूर, पाडळी, झरी, वडगाव या भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या वनसंपदेची देखरेख करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक, वनपाल, चौकीदार, वनमजूर व इतर अधिकारी शासनाने नियुक्त केले आहेत. मात्र, या विभागातील बहुसंख्य कर्मचारी व अधिकारी हे नेमणूक केलेल्या ठिकाणी हजर न राहता शहरातून ये- जा करतात व आपल्या कार्यक्षेत्रातील गावात असलेल्या पंटरशी मोबाइलद्वारे संपर्कात असतात. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वनविभागाच्या कर्मचारी करतात शहरातून वनांची देखरेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:04 AM