शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

श्रोत्यांनी कवितेतून अनुभवले पावसाचे रूप

By admin | Published: June 29, 2014 12:42 AM

औरंगाबाद : नको, नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा’ अशा पावसाच्या काव्यमय सुखद सरींचा अनुभव श्रोते घेत असतानाच दडी दिलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दाहकताही व्यक्त झाली

औरंगाबाद : ‘वर्षाने आले पावसाचे दिस, मातीला फुटले हिरवे पीस... सृष्टीने घेतला श्रावण श्वास...’, ‘नको, नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा’, ‘नको नको रे पावसा असा अवेळी रुसवा...’ अशा पावसाच्या काव्यमय सुखद सरींचा अनुभव श्रोते घेत असतानाच दडी दिलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दाहकताही व्यक्त झाली. प्रसंग होता आयएमए हॉल येथे आयोजित पाऊस कवितांच्या अभिवाचनाचा. पहिल्या पावसात भिजण्यासाठी आतुर असलेली मंडळी कवितांच्या पावसात भिजण्यासाठी हजर होती. मात्र, अनेकांच्या चेहऱ्यावर ताण दिलेल्या पावसाची कधी एकदा ‘बरसात’ होते असेच भाव होते. आज रसिकांनी काव्याच्या पावसात मनसोक्त भिजून साहित्यातील पाऊस अनुभवला. पावसाचे रुसणे, फुगणे, पावसाच्या सरी, जोरदार, वादळी वाऱ्यासह मुसळधार, ढगफुटी अशी पावसाची विविध रूपे आज काव्याच्या रूपातून सादर झाली. हॉलमध्ये प्रवेश करताच बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ या काव्याच्या प्रती व निशिगंधांचे फूल देऊन आयोजकांनी प्रत्येकाचे मनपासून स्वागत केले. ‘एकदा एक पाऊस शाळेत गेला’ ही विजय शेंडगे यांची रचना सहा वर्षांच्या रेवा जोशी या चिमुकलीने सादर करून सर्वांना लहानपणीच्या आठवणीत नेऊन ठेवले. ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ या सुधीर मोघे यांनी गायलेल्या लयबद्ध गीताला रसिकांनी टाळ्यांची साथ दिली. ‘तुझे रिमझिमणे, तुझे गडगडणे बोलवते रे मला... माझ्यासाठी घेऊन येतोस इंद्रधनूचा झुला...’ अशा काव्यात श्रोतेही चिंब भिजून त्याचा मनमुराद आनंद लुटत होते. ‘सुनसान रस्त्यावर उगाच एकटा कोसळत नको राहू, नाही तर लोक म्हणतील वेडा झाला पाऊस...’ या काव्यातून साऱ्यांनी पावसाचे लहरी रूप अनुभवले. ‘पाऊस हसवितो, नाचवितो अन् उद्ध्वस्त करतो’ ही कविताही साऱ्यांना चटका लावून गेली. ‘हातात गुंफून हात तुझ्या चालत होतो तेव्हा... पाऊस फुलांचा होता’ ही मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली प्रेमकविता साऱ्यांना सुखवून गेली. नामांकित कवींच्या पावसावरील कविता सीमा मोघे, गीता देशपांडे, अश्विनी दाशरथे, वृषाली देशपांडे, सौरभ सदावर्ते व हर्षवर्धन दीक्षित यांनी तेवढ्याच तल्लीनतेने सादर केली. कविता सादर होतानाच डॉ. जे.पी. वैद्य यांनी पावसाचे चित्र साकारून वेगळीच अनुभूती दिली. पाऊस येणार जोरदार येणार... पावसाच्या कवितेचे राष्ट्रगीत असा उल्लेख करीत बालकवींची ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता रसिकांनी सामूहिकरीत्या गाऊन पावसाला जणू सादच घातली. आता जरी पावसाने दडी मारली तरी हवालदिल होऊ नका. कारण, ‘पाऊस येणार जोरदार बरसणार’अशी सकारात्मक ऊर्जा या कार्यक्रमाने सर्वांना दिली.