शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

By योगेश पायघन | Published: October 03, 2022 3:10 PM

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती.

औरंगाबाद-वाड्मय चौर्याच्या आरोपावरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या २०१३ च्या पीएच.डी ला परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तब्बल ९ वर्षांनी स्थगिती दिली आहे.

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती. त्यात प्रा. सलामपुरे यांनी २०१३ च्या समाजशास्त्र विषयात संशोधनासाठी डाॅ. शिवाजी भागानगरे यांच्या अर्थशास्त्र विषयातील २०११ च्या संशोधनाची नक्कल केलेली असून हे काॅपी राइट ॲक्टचे उल्लंघन डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी. रद्द करून संशोधक व मार्गदर्शकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. २३ जुलै रोजी युजीसीच्या मार्गदर्शक सुचेनेनुसार कुलगुरूंनी आयएआयपी समिती नेमली. त्या समितीच्या चौकशी अहवालानंतर ६ सप्टेंबर, १४ सप्टेंबर रोजी पीएचडी विभागाकडून डाॅ. सलामपुरे यांना लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी २९ सप्टेंबर रोजी सादर केलेला लेखी खुलासा असमाधानकार असल्याने तो नाकारण्यात आल्याने ही कारवाई केल्याचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाच्या पत्रात म्हटले आहे.

असा आहे ठराव ?सत्य निष्ठा व वाड्मय चौर्य नियम २०१८ मधील कलम १२.२ नोट २ मधील तरतुदीनुसार तत्काळ प्रभावाने पीएचडी स्थगित ठेवून. महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२८ (३) मधील तरतुदीनुसार पुढील कारवाईचा ठराव परीक्षा व मुल्यमापन बैठकीने घेण्यात आला आहे.

पुढे काय होणार ?चाैकशीच्या समितीच्या अहवालनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळ बैठकीसमोर सादर खुलासा अमान्य करण्यात आला. यासंबंधी घेतलेला ठराव विद्या परीषद आणि व्यवस्थापन परीषदेतील निर्णयानंतर विद्यापीठ कायद्यातील १२८-३ अनुसार पुढील कार्यवाहीसाठी कुपपतींकडे पाठवण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी म्हटले आहे.

केवळ कुलगुरू येवले यांची आकसबुद्धिमी २००० मध्ये एमएच्या आधारे नोकरीस लागलो. २००७ मध्ये युजीसीने एमफिलमध्ये सुट दिली. त्या यादीत माझे नाव आहे. २०११ ला छत्रपती शाहू महाराज यांच्यावर पहिली पीएचडी केली. २०१३ ला २००७ च्या माझ्या एमफिलचा विषय वाढवून दुसरी पीएचडी केली. माझ्या विरोधात तक्रार करणारा १२ वी नापास आहे. समितिला सर्व कागदपत्रे, वस्तुस्थिती सांगितली. तरीही जाणीवपूर्वक माझे म्हणणे ग्राह्य न धरता पीएचडी स्थागितीचा एकतर्फी निर्णय घेतला. ही केवळ कुलगुरू येवले यांची आकसबुद्धि आहे. ज्या कायद्यानुसार कारवाई केली जात आहे तो कायदा माझ्या पीएचडी नंतर २०१८ चा कायदा आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य असतांना मी परीक्षा नियंत्रक निवड समितीत होतो. त्यांच्या चुकीच्या निवडीला विरोध केला. अकॅडमीक ऑडीट कमिटीत असून गेल्या दोन वर्षातील १५ ते २० बैठकांना मला बोलावण्यात आलेले नाही. त्या एसी रूममधील बैठकांच्या निर्णयांना विरोध केला. कुलगुरूंविरोधात पत्रकार परीषद घेतली. त्यामुळेच माझ्याविरोधात सुडबुद्धीने वागत आहेत.-डाॅ. फुलचंद सलामपुरे, माजी व्यवस्थापन परीषद सदस्य

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद