शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:46 AM

जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे.

रत्नाकर तांबट ।लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. गावाच्या आजूबाजूला झालेले सिमेंट बंधारे, मातीनाला बांधांमुळे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख मिटली आहे. सध्या इतर गावांनाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता या गावात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूचा परिसर विविध पिके आणि फळबागांनी बहरला असून, राज्यभरातील ग्रामपंचायती काम पाहण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर गोलटगावपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या काºहोळ गावातील ग्रामस्थांना जवळपास २०१३ पूर्वी हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. कधी कधी टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत होता.या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरलाहोता. यानंतर २०१५ मध्ये ग्रामपंचायत, गावकरी, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने (सीएसआर) गावचा कायापालट केला. सीएसआरने हे गाव सेवा संस्थेला दिले. त्यांच्या सहकार्याने गावात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता जवळपास तीन वर्षांत गावाच्या आजूबाजूला ९ सिमेंट बंधारे व चार मातीनाला बांध तयार करण्यात आले. काम पूर्णत्वास येताच पावसाळ्यात या बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विहीर तसेच बोअर, हँडपंपांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजघडीला बोअर आणि विहिरींची पाणीपातळी ८ ते १० फुटांवर आली आहे. येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजघडीला ४४.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटला आहे.विशेष म्हणजे यापूर्वी पाणी नसल्यामुळे येथील शेतकरी हंगामी पिके घेत असत. फळबागा लागवडीचा कुणी विचारही करीत नव्हता. मात्र, आता गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हासह डाळिंब, द्राक्ष, मोसंबीची पिके घेत आहेत. यामुळे बळीराजाच्या आर्थिक वृद्धीस मदत झाली आहे. पावसाचे पाणी शिवाबाहेर न जाऊ देण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शिवारात जिरवू, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच सचिन खलसे यांनी दिली.गावाचा झालेला कायापालट पाहून जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावाला आवर्जून भेट देत आहेत. अशी कामे आमच्या गावात करण्याची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता अरविंद येलम यांनी दिली. या कामांसाठी सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, उपसरपंच रुख्मिणी खलसे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाचफुले यांच्यासह गावकºयांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सरपंच हिरामण ढगे यांनी दिली.