जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. निवृत्त झाल्यानंतर जाधव यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. भाजपमध्ये काम करताना कर्तृत्ववान, क्रियाशील व विद्वान व्यक्तींचा सन्मान होत नसल्याचे सातत्याने अनुभवास आल्याने हा पक्ष सोडून आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या काळात वैजापूर तालुक्याचा कुठलाही विकास झाला नाही. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अजूनही कर्जाचा बोजा आहे. त्यांना दुसऱ्या बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रेंगाळला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो सह