शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

शिवसेनेचे माजी खासदार कांबळे भाजपच्या वाटेवर

By admin | Published: August 27, 2014 1:25 AM

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीबापू कांबळे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

विशाल सोनटक्के , उस्मानाबादउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीबापू कांबळे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कांबळे यांनी मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई येथे या अनुषंगाने चर्चा केली असून, कांबळे यांचा भाजपामध्ये लवकरच अधिकृत प्रवेश होणार असल्याचे समजते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरूंग लावण्याचे काम कांबळे यांनी केले होते. १९५१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिवाण राघवेंद्र श्रीनिवासराव यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९५७ मध्ये व्यंकटराव श्रीनिवासराव हे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले. १९६२ आणि त्यानंतर १९६७ आणि १९७१ अशा तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्याच तुळशीराम आबाजी पाटील यांनी विजयश्री मिळविली होती. १९७७ च्या निवडणुकीत तुकाराम सदाशिव शृंगारे तर १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्र्यंबक मारुतीराव सावंत हे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर अरविंद कांबळे यांनी १९८४, १९८९ व १९९१ असे सलग तीन टर्म काँग्रेसची सत्ता कायम राखली. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद कांबळे पुन्हा विजयी झाले. मात्र अवघ्या अकरा महिन्यांत पुन्हा मतदारांना लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले. यात शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कानिफनाथ देवकुळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अरविंद कांबळे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर शिवसेनेची उमेदवारी कल्पना नरहिरे यांच्याकडे आली. या दरम्यान शिवाजी कांबळे शिवसेनेतही फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान मंगळवारी शिवाजी कांबळे यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी चर्चा केल्याची माहिती प्राप्त झाली असून, कांबळे यांचा भाजपामध्ये प्रवेश जवळपास निश्चित समजला जात आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याच्या अनुषंगाने माजी खासदार शिवाजीबापू कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी मुंबई येथे भेट झाली मात्र यावेळी भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचे कांबळे यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश करणार असेन तर तुम्हाला निश्चित माहिती देऊ, असे सांगत फडणवीस यांच्याशी झालेली बैठक रुटीन असून, त्यात इतर खाजगी विषयावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान याबाबत भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, शिवाजी कांबळे भाजपाच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.