गाढेगावचे माजी उपसरपंच कांताराव शिंदे यांचा मृतदेह सोमवारी सकाळी त्यांच्याच शेतवस्तीवरील घरापासून काही अंतरावर आढळून आला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस निरीक्षक राहुल पाटील, प्रशांत मुंढे, ठसेतज्ञ अमोल पवार, पोलीस नाईक हरिश्चंद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व त्यांचे पथकही घटनास्थळी हजर झाले.
कांतराव शिंदे हे रविवारी घराबाहेर पडले होते. कधीकधी ते रात्री उशिरापर्यंत घरी येत नसल्याने उशिरा येतील म्हणून घरातील सर्वजण झोपी गेले. रात्री शिंदे घरी आले नाही, म्हणून त्यांचा मुलगा लखन शोधण्यासाठी सोमवारी सकाळी घराबाहेर पडला असता, वाळूज एमआयडीसी रोडवर शिंदे यांचा मृतदेह आढळला. त्यांना जबर मारहाण केल्यामुळे नाकातून रक्तस्राव झालेला होता, तर सर्वांगावर मारहाणीचे वळ उमटलेले होते. मृतदेहाजवळ एक लाकडी दांडा, कमरेच्या पट्ट्याचे इंग्रजीत एस अक्षर असलेली क्लीप, शर्टाचे काळ्या रंगाचे बटन, आदी आढळून आल्याने शिंदे यांचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
चौकट
काही तासांतच आरोपी अटकेत
कांतराव शिंदे यांचा खून झाल्याच्या अनुशंगाने पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली व अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावीत गावातीलच अनिल ऊर्फ पप्पू अशोक केदारे (२१), संजय मनोहर केदारे (२६), राजेश प्रभाकर केदारे(२३) यांना परिसरातील एका शेतातून ताब्यात घेतले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा पुलाजवळ ब्रम्हगव्हाण पंप हाऊस रोडवर कांतराव शिंदे यांचा शेतीच्या वादातून खून केल्याची कबुली या तिघांनी दिल्याचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, पोलीस नाईक नरेंद्र खंदारे, संजय भोसले, वाल्मीक निकम, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, संतोष डमाळे, आदींनी केली.
030521\sanjay ramnath jadhav_img-20210503-wa0020_1.jpg
कांतराव शिंदे