औरंगाबाद: अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलेरी क्लिंटन या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. उद्या त्यांचे शहरात आगमन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या दौरा नेमका कशासाठी आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही.
हिलेरी क्लिंटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सध्या त्या गुजरात येथे आहेत. तेथून त्या औरंगाबाद येथे येतील. खुलताबाद येथील एका फार्म हाउसवर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत अलर्ट मिळाला असून सुरक्षेविषयी सर्व तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यात हिलेरी क्लिंटन वेरूळ लेणीला भेट देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी अहमदाबाद येथे 'सेल्फ इम्पावर्ड वीमेन एसोसिएशन' च्या कार्यक्रमात हिलेरी यांनी सहभाग नोंदवला. येथे त्यांनी हवामान बदलामुळे कामगार स्त्रियांसामोर नवीन आव्हान उभे राहिल्याचे स्पष्ट केले.