छत्रपती संभाजीनगर : रेल्वे येण्याच्या वेळेलाच चार म्हशी रुळावर आल्याने देवगिरी एक्सप्रेस खाली त्यांचा मृत्यू झाला. परिणामी रेल्वे बुम (रेल्वे बॅरिगेत) तुटल्याने शिवाजीनगर रेल्वे गेट पाच तासांपासून बंद आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, साडेबारा वाजता काही म्हशी शिवाजीनगर परिसरातील रेल्वे रुळावर करण्यासाठी आल्या होत्या. त्याच दरम्यान चिकलठाणा कडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या हैदराबाद एक्सप्रेस येत होती. रेल्वे मॅन ला हा प्रकार कळताच त्याने म्हशीं ना हाकलण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंतर कमी असल्याने चारही म्हशी रेल्वे खाली चिरडल्या गेल्या. यात दोन म्हशी थेट उडून रेल्वे रूमवर पडल्याने बूम मुळासकट तुटले. परिणामी शिवाजीनगर रेल्वे गेट ची वाहतूक थांबली. बराच वेळ वाहतूक खोळंबल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर वाणी मंगल कार्यालयापासून रस्ता बंद करण्यात आला. मात्र रेल्वे गेट बंद पडल्याने शहरवासीयांना दर्ग्याकडून लांबून देवलाई गाठावे लागले.मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाहीरेल्वे रुळावरील मृत म्हशी बाजूला करण्यासाठी पोलिसांसहस्थानिकांनी दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपाच्या एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. मनपा कर्मचाऱ्यांनी म्हशी चे मृतदेह बाजूला केले असते तर बुम दुरुस्त करून गेट उघडले गेले असते, अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली