औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या राष्टÑीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखले. यजमानांच्या स्वानंदी वलझाडे, दूर्वांकुर चाळके, प्राप्ती किनारे, सुमित पोटे यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर कौशिक चोकोटे याने रौप्यपदक व आयुष गोरे, तनुश्री पालांदूरकर यांनी कास्यपदक पटकावले.महाराष्ट्राच्या स्वानंदी वलझाडे आणि प्राप्ती किनारे यांनी अनुक्रमे १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या रिदमिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर सुमित पोटे याने १७ वर्षांखालील मुलांच्याआर्टिस्टिक प्रकारात गोल्डन कामगिरी केली. मुलांच्या १४ वर्षांखालील रिदमिक प्रकारात कौशिक चोकोटे याने रौप्यपदकाची कमाई केली. मुलांच्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटात रिदमिक प्रकारात महाराष्ट्राच्या दूर्वांकुर चाळकेने सोनेरी कामगिरी केली. आयुष गोरे व तनुश्री पालांदूरकर यांनी १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले.निकाल पुढीलप्रमाणे : १७ वर्षांखालील मुले (वैयक्तिक) : सुवर्ण : शंतन डे (पश्चिम बंगल), रौप्य : तन्मय दास (त्रिपुरा), कास्य : आयुष गोरे (महाराष्ट्र). मुली : सुवर्ण : शैली दबीनाथ, रौप्य : स्नेहा दास (पश्चिम बंगाल), कास्य : तनुश्री पालांदूरकर (महाराष्ट्र).१४ वर्षांखालील मुले (रिदमिक) : सुवर्ण : एस. कबीलाराम, रौप्य : कौशिक चोकोटे (महाराष्ट्र), कास्य : संजीव कुमार (दिल्ली), देबयान रॉय (पश्चिम बंगाल).१४ वर्षांखालील मुली (रिदमिक) : सुवर्ण : स्वानंदी वलझाडे (महाराष्ट्र), रौप्य : हर्षिता गोस्वामी (आसाम), कास्य : देवपर्णा (पश्चिम बंगाल).१७ वर्षांखालील मुले (रिदमिक) : दूर्वांकुर चाळके (महाराष्ट्र), रौप्य : शिवम भार्गव (दिल्ली), कास्य : प्रभात कुमार (बिहार). १७ वर्षांखालील मुली (रिदमिक) : सुवर्ण : प्राप्ती किनारे (महाराष्ट्र), रौप्य : माजिदा खातून (पश्चिम बंगाल), कास्य : गौरी बी.आर. (कर्नाटक). १७ वर्षांखालील मुले (आर्टिस्टिक) : सुवर्ण : सुमित पोटे (महाराष्ट्र), रौप्य : आर्यन राजुरिया (दिल्ली), कास्य : श्याम गणेश जी.आर. (तामिळनाडू). बक्षीस वितरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, बाळासाहेब थोरात, राजेंद्र राठोड, जे.पी. अधाने, स्पर्धा निरीक्षक राम अवतार, एम.पी. यादव, जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव सुरेश मिरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकूळ तांदळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले.
शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या चार जणांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:26 AM
विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या राष्टÑीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखले. यजमानांच्या स्वानंदी वलझाडे, दूर्वांकुर चाळके, प्राप्ती किनारे, सुमित पोटे यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर कौशिक चोकोटे याने रौप्यपदक व आयुष गोरे, तनुश्री पालांदूरकर यांनी कास्यपदक पटकावले.
ठळक मुद्देस्वानंदी, दूर्वांकुर, प्राप्ती, सुमित यांची गोल्डन कामगिरी