शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जिल्ह्यातील चार पालिकांत नवे गडी, नवे राज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2017 11:57 PM

उस्मानाबाद :परंडा, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या चार पालिकांच्या विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या

उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वीच उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. या निवडीनंतर आता विषय समिती सभापतींच्या निवडींची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील परंडा, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या चार पालिकांच्या विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या. तर गणपुर्तीअभावी भूम पालिकेतील सभापतींच्या निवडी होऊ शकल्या नाहीत.नळदुर्ग पालिकेच्या नियोजन व विकास समिती सभापती उपनगराध्यक्ष नितीन कासार, पाणीपुरवठा समिती सभापती दयानंद बनसोडे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती म्हणून बसवराज धरणे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भारती बनसोडे, बांधकाम समिती सभापतीपदी काजी आसिफा बेगम नजर अहमद यांची निवड झाली आहे. यावेळी स्थायी समितीचेही गठण करण्यात आले. नगराध्यक्ष रेखाताई जगदाळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उमरगा पालिकेतील विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी ११ वाजता सभागृहात बैठक झाली. यावेळी स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी प्रेमलता टोपगे, बांधकाम समिती सभापतीपदी हंसराज गायकवाड, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी विक्रम मस्के, महिला व बाल विकास समिती सभापतीपदी शिल्पा शिंदे, नियोजन, कर संकलन व शिक्षण समिती सभापतीपदी सविता वाघमारे, आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतीपदी महेश माशाळकर यांची वर्णी लागली. दरम्यान शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांसह सात सदस्यांनी निवडीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, भूम पालिका सभापतींच्या निवडीही शुक्रवारीच होणार होत्या. परंतु, गणपूर्तीअभावी त्या होऊ शकल्या नाहीत.परंडा नगर परिषदपरंडा नगर परिषदेत पिठासीन अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शहाबर्फीवाले नसरीन बाशा, बांधकाम सभापतीपदी दखनी खुर्शिद बेगम जमील, पाणीपुरवठा सभापतीपदी शेख जुलेखा जब्बार, वाचनालय समिती सभापतीपदी रत्नमाला राहुल बनसोडे तर स्थायी समिती सभापतीपदी सौदागर म. जाकीर म. इस्माई यांची वर्णी लागली आहे. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका मुख्याधिकारी डॉ. मिताली संचेती यांचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)