लाखनी येथील माया किशोर कदम (२५) ही शेतकरी महिला शेतात काम करीत असताना चार वाजेच्या दरम्यान रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यानंतर रानडुकरांनी शेजारच्या शेतातील सखाराम कदम (६५) यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. नंतर जवळच असलेल्या किशोर रामजी कदम यांच्यावरही हल्ला करीत त्यांच्यासह आणखी एका महिलेला जखमी केले. यातील काही जखमींवर देवगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर वैजापूर वन विभागाचे वनरक्षक पी. जी. लकडे व वनपाल एस. एस. सपकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात विशेषतः महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वन विभागाने रानडुकरांचा व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
चाैकट
वन्य प्राण्यांचा त्रास वाढला
गेल्या अनेक दिवसांपासून गारजसह लाखणी, बायगाव, भोकरगाव, जांबरखेडा, मांडकी, बाभूळगाव आदी गावात रानडुकरांसह अन्य वन्य प्राण्यांचा त्रास वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अगोदरही या भागांमध्ये वानर, तरस, रानडुकरांनी शेतकऱ्यांना जखमी केले होते.
फोटो कॅप्शन : वैजापूर तालुक्यातील लाखणी येथे रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी झालेली महिला.
170321\pravin sahebrao nipane_img-20210316-wa0048_1.jpg
वैजापूर तालुक्यातील लाखणी येथे रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी झालेली महिला.