लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आई- बहिणीवरून शिवी दिल्यामुळे रविवारी रात्री गांधीनगरात दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. एका परिवाराने दुसऱ्यावर तलवार, चाकू आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याने चौघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गांधीनगरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी पाच जणांना अटक केली.