लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोलापूर ते धुळे या महामार्गातील पहिल्या टप्प्यातील काम ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील औरंगाबाद ते धुळे या महामार्गाच्या कामाचे चार तुकडे करून निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. यातील बोढरे ते धुळे या टप्प्यातील काम सुनील हायटेक या संस्थेला देण्यात आले आहे. उर्वरित तीन टप्प्यांच्या निविदा प्रक्रियेत आहेत. उर्वरित निविदांमध्ये झाल्टा ते ए.एस.क्लब, ए.एस.क्लब ते तेलवाडी आणि तेलवाडी ते बोढरे या तीन टप्प्यांचा समावेश आहे. २ हजार कोटींचा हा दुसरा टप्पा आहे. यासाठी बीओटीतून निविदा मागविण्यात आल्या होत्या, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अॅन्युटीतून निविदा मागविल्या त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.औट्रम घाटातील बोगद्यासाठी सुरूंग लावायचा की डोंगर फोडायचा यावर अंदाजपत्रक तयार होईल. आगामी दोन-तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, तसेच नागपूर वनविभाग कार्यालयाकडून परवानगीही प्राप्त होईल.रेल्वेमुळे दोन वेगवेगळे डीपीआर तयार करावे लागणार आहेत, असे नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. बोगद्यासाठी डोंगर फोडण्याला सुमारे १ हजार कोटी रुपयांची मशिनरी लागणार आहे. ती यंत्रणा भाड्याने घ्यायची की, स्वत: केंद्र शासनाने खरेदी करायची, याबाबत विचार सुरू आहे. देशात आणखी काही बोगद्यांची कामे करायची आहेत. त्यामुळे जर्मन तंत्रज्ञानाची मशिनरी शासन स्वत: खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या कामाचे ४ तुकडे
By admin | Published: July 10, 2017 12:44 AM