लोकमत न्यूज नेटवर्कचितेगाव : बिडकीन पोलिसांनी रविवारी चितेगाव येथे तलवारी बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळील चार तलवारी जप्त केल्या आहेत. वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा मोठेपणा दाखविण्याचा प्रकार त्या तरुणांना चांगलाच महागात पडला. पोलिसांनी वाढदिवसाला तलवारीने केक कापणा-या तरुणांची धरपकड सुरू केली. त्या तरुणांच्या घरांची झाडाझडती घेतली असतात्यांच्याकडे धारदार चार तलवारी आढळल्या. विजय बाळासाहेब सुखदान (१९, रा. चितेगाव, ता. पैठण), सचिन छगुराव खरात (१९, रा.चितेगाव, ता. पैठण), संतोष टाक (४५, रा. आलानातांडा ता. जि. औरंगाबाद) अशी त्या तरुणांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी शस्त्र बनवणारे साहित्य व कारखान्यातून पाच तलवारी जप्त केल्या होत्या. त्यावरून बिडकीन पोलीस पथकाने सोशल मीडियाचा आधार घेत धरपकड सुरू केली आहे.शहरात कुरिअर सेवेतून आलेल्या तलवारीचे पार्सल डीएमआयसी परिसरात उतरले आहेत. कुरिअरच्या माध्यमातून तलवारी आल्या असाव्यात, अशी पोलीसांना शंका आहे. तलवारी बनविणारा कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. रविवारी चार तलवारी, एकूण ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पुन्हा सापडल्या चार तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:04 AM