लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला शिक्षिका कर्मचारी पतसंस्था व आदर्श शिक्षक कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील चार हजार कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळातील सर्व नियम पाळून सलग दोन आठवड्यांपासून प्रत्यक्ष शाळा, कार्यालय किंवा निवासस्थानी जात कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.
आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळेतील महिला शिक्षिका, महिला लोकप्रतिनिधी, डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी अशा चार हजार महिलांना ‘आदर्श महिला सन्मानपत्र’ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी क्रांतिज्योती महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सुनंदा कुंभार, उपाध्यक्ष सुरेखा पाथरीकर, सचिव पुष्पा दौड व आदर्श शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव ताठे, उपाध्यक्ष अनिल विचवे, सचिव शाकीर अली सय्यद, संचालक सुषमा राऊतमारे, पद्मा वायकोस, सुरेखा खैरनार, जयाजी भोसले, जयश्री बनकर, स्वाती केतकर, छाया वालतुरे, जयश्री दहिफळे, सुषमा साळुंके, अलका झरवाल, आदींनी परिश्रम घेतले.