शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 19:43 IST

शासकीय योजनेच्या मंजूरीसाठी दलाली करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल

- श्रीकांत पोफळे करमाड: संजय गांधी, श्रावणबाळ, लाडकी बहिण अशा शासनाच्या विविध योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या वंदना म्हस्के ( रा. हातमाळी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील महिलांनी  गाऱ्हाणे मांडल्यानंतर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी स्वतः महिलांचे जवाब घेत करमाड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या वतीने तलाठी विशाल मगरे यांनी फिर्यादी दिली. 

मागील काही महिन्यांपासून शासनाच्यावतीने आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले. हे अनुदान पुन्हा चालू करण्यासाठी तालुक्यातील गोरगरीब महिला गाव पातळीवरील पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान, शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली. यामुळे बंद अनुदान मंजूर करून देते, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देते असे सांगून वंदना मस्केने महिलांकडून पैसे उकळले. मात्र,पैसे देऊनही लाभ मिळत नसल्याने महिलांनी विचारणा करताच म्हस्केने त्यांना धमकी दिली. त्यानंतर करमाड पंचक्रोशीतील महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. 

तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी देखल घेत तक्रारदार महिलांचे जबाब नोंदवून घेतले. लाडकी बहीण योजनेत कुणी दलाली करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी विधानभवनात दिले होते. या आदेशपत्राचा उल्लेख करत तहसीलदार मुंडलोड यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्यावतीने तलाठी विशाल मगरे यांनी फिर्याद दिली. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी रामेश्वर ढाकणे पुढील तपास करत आहेत. 

आरोपी वंदना मस्के यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटरहेड वापरून योजना मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. शिवाय याच लेटरहेडवर विविध शासकीय कार्यालयात आरटीआयचा वापर करत माहिती मागवत असत. यासंदर्भात प्रहारच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

लाडकी बहीण योजनेत दलाली करण्यावर राज्यातील पहिला गुन्हा अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. सरकार व प्रशासनाच्या वतीने मंजूरीसाठी कुठेही पैसे लागणार नाही. अशावेळी लाभार्थ्यांनी पैसे देणेच मुळात चुकीचे आहे - रमेश मुंडलोड, तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार