महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन रांजणगाव शेणपुजी संसस्थेचा अध्यक्ष काकासाहेब एकनाथराव जाधव (५६), संस्था सचिव कल्पना काकासाहेब जाधव-गवळी (४८), माजी मुख्याध्यापक तथा सहशिक्षक शाम बाबूराव गोलार (३८), शिक्षिका मंगला रमेश धुमाळ आणि शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांचा आरोपीत समावेश आहे.
महेंद्रसिंग प्रेमसिंग पाटील (३८, रा. माणिकनगर, नारेगांव) हे बडतर्फ शिक्षक आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी संगीता धुमाळ यांच्या वैयक्तिक मान्यतेचा बनावट प्रस्ताव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात आरोपी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी १५ एप्रिल २०१९ रोजी सादर केला होता. या प्रस्तावात त्यांनी यापूर्वीच्या जावक क्रमांकाचा उल्लेख करून त्यानुसार धुमाळ यांना मान्यता देऊन त्यांचे वेतन काढण्याची विनंती केली होती. यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने धुमाळ यांचे वेतन अदा केले होते. प्रत्यक्षात संस्थाचालक यांनी ज्या जावक क्रमांकाच्या आधारे त्यांना मान्यता देण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. त्या प्रस्तावात धुमाळ यांचे नाव नव्हते. असे असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपीसोबत संगनमत करून बनावट जावक क्रमाकांकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव मंजूर करून धुमाळ यांना सुधारित मान्यता देऊन वेतन अदा करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले. याविषयी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयांत तक्रार केली. मात्र, त्यांनी या फसवणूक प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने याविषयी त्यांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार केली.
======
चौकट
न्यायालयाच्या आदेशावरून नोंदविला गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पाटील यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश वेदांतनगर पोलिसांना दिले. पोलिसांनी गुरुवारी पाटील यांची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१,(३४) नुसार गुन्हा नोंदविला. सपोनि-कंकाळ तपास करत आहेत.