शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

‘एसटी’च्या नावाखाली फसवणुकीचा ‘उद्योग’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:08 AM

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयात एक तरुणी निरीक्षकपदी रुजू होण्यासाठी दाखल होते.

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयात एक तरुणी निरीक्षकपदी रुजू होण्यासाठी दाखल होते. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे नियुक्तीपत्र देते. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण हे नियुक्तीपत्र बनावट होते. नोकरीचे आमिष दाखवून ‘एसटी’च्या नावाखाली फसवणुकीचा उद्योग सुरू असल्याने तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.या तरुणीकडून जवळपास ३९ हजार रुपये उकळण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळण्याचा प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला बँकेच्या खात्यावर काही रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यानंतर नियुक्तीपत्र देण्यासह विविध कारणे पुढे करून आणखी पैशांची मागणी केली जाते. नोकरी मिळण्याच्या आशेने तरुण पैसे देतात. पैसे उकळल्यानंतर थेट बनावट नियुक्तीपत्र हाती टेकविले जात आहे.लोगोचा गैरवापरएसटी महामंडळाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी बा. दि. चंदनशिवे म्हणाले, एसटी महामंडळाच्या लोगाचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे पोलिसांत यासंदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे. तसेच संबंधित तरुणीनेही पोलिसांत तक्रार केलेली आहे.