औरंगाबाद : लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम) आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित ४६ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आज उदघाटन झाले.
महाराष्ट्र ट्रस्ट मेळघाटचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी डॉ. कविता सातव, अमेरिकेतील प्रख्यात सर्जन डॉ. राज लाला यांच्यासह डॉ. ललिता लाला, एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया, एमजेएफ सुनील देसरडा,क्लब अध्यक्ष विजय अग्रवाल , प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रीती जैन, केमिस्ट असोसिएशनचे निखिल सारडा आदींची यावेळी उपस्थिती होती.
हे शिबीर शनिवार, दि. १७ सप्टेंबर पर्यंत चालेलया शिबिरात डॉ. राज लाला यांच्यासह डॉ. ललिता लाला आणि डॉ. अमित बसन्नवार हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील. शिबिराचे हे ४६ वे वर्ष आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता नेमण्यात आलेल्या समित्यांमध्ये आयोजन समिती, मेडिसिन समिती, पोस्ट ऑपरेशन समिती, रजिस्ट्रेशन समिती, फूड समिती यांच्यासह विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात प्रकल्प सचिवपदी प्रीती जैन, सहप्रकल्पप्रमुख कल्याण वाघमारे, भूषण जोशी आणि डॉ.उज्ज्वला दहीफळे यांचा समावेश आहे.