पुढील महिनाभर दररोज २५० ते ३०० जणांना येथे मोफत जेवण देण्यात येणार आहे. आचार्य मोक्षरत्नजी म. सा. यांच्या प्रेरणेने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अन्नछत्रालयाचे उद्घाटन सकळ जैन समाजाचे कार्याध्यक्ष सुभाष झाबंड यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अतुल सावे यांनी या प्रकल्पाला भेट दिली.
येत्या दिवसात १,००८ गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून दिले जाणार आहे. तसेच समाजातील ७२ कुटुंबांना एक महिन्याचे किराणा साहित्य दिले जाणार आहे अशी माहिती, प्रकल्पप्रमुख रवी मुगदिया यांनी दिली. प्रकल्प यशस्वीतेसाठी अभय मांगलिक मंडळासोबत आनंदजी कल्याणजी श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट सहकार्य करत आहे. यावेळी मनसुख झाबंड, महावीर पाटणी, भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल संचेती, मनीषा भन्साळी, जैन अलर्ट ग्रुपचे अजित जैन, निलेश जैन, प्रकाश कोचेटा, संजय संचेती आदी उपस्थित होते.