शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कृषीला मोफत वीज अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:49 AM

तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.पत्रकारांशी बोलताना गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळातील अवघ्या दोन जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांची थकबाकी २३६५ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी ११९८ कोटी ही थकबाकीची मूळ रक्कम आहे. थकबाकी वसुलीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या; परंतु शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या राज्यात कृषिपंपांची संख्या मोठी असल्यामुळे मोफत वीज देणे परवडणारे नाही.शहरातही वीज चोरी आणि थकबाकी वसुलीबाबत मोहीम राबविण्यात आली. तेव्हा २ लाख वीज चोरी व सदोष मीटर आढळले, यांना महावितरणने ८० लाख रुपयांचे वीज बिल आकारले आहे.शोधमोहिमेत अनेक वीज ग्राहक गायब असल्याची बाबही समोर आली आहे. शहरात सध्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २२५५ ग्राहक आहेत. यांच्याकडे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यापैकी २५२ ग्राहकांकडून अवघी २ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित ९७४ ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाखांची थकबाकी असून, या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. १६५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यांच्याकडे ३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे असले तरी ८६४ ग्राहक हे सापडतच नाहीत. यांच्याकडे १९ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.महावितरणच्या कर्मचाºयांनी सुरू केलेली ग्राहकांची शोधमोहीम ही २० जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र शहरातील वीज ग्राहकांचे सविस्तर पत्ते नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येईल. ज्यामुळे यापुढे गायब ग्राहकांची संख्या कमी होईल. त्यांना वीज बिल वेळेवर व नियमित मिळेल.विद्युत सुरक्षा सप्ताहऔरंगाबाद परिमंडळामध्ये ११ ते १८ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ११ जानेवा रोजी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकेचे विमोचन केले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंबंधीची ३० मिनिटांची चित्रफीत दाखवली जाईल.